HP चे नवे दमदार ओमेन १६ गेमिंग नोटबुक्स भारतात सादर

कुठल्याही सुविधा आणि वैशिष्ट्यांशी तडजोड न करता हा फक्त २.३ किलो वजनाचा आजघडीला सगळ्यात हलका गेमिंग लॅपटॉप (Gamming Laptop) आहे. शाश्वत पर्यावरणाशी असलेली बांधिलकी एचपीने सातत्याने जपली आहे आणि त्यामुळे नव्या ओमेन डिव्हाइसमधील (Omen Device) काही भाग ग्राहकांनी वापरून समुद्रात फेकलेल्या प्लास्टिकपासून तसेच ॲल्युमिनीअम स्टँप्ड कव्हरचा पुनर्वापर करून तयार करण्यात आले आहेत.

  • 11th जेन इंटेल कोअर प्रोसेसरची ताकद, 16.1 इंची आकर्षक डिस्प्ले आणि न्यू जेन4 एसएसडी स्टोरेज

नवी दिल्ली : एचपीने (HP) भारतात एचपी ओमेन (HP Omen) १६ ही गेमिंग (Gamming) पोर्टफोलिओ उत्पादनांची श्रेणी सादर केली आहे. या नव्या गेमिंग नोटबुकमध्ये १६.१ इंची स्क्रीनमध्ये तुम्हाला १६:९ असा अस्पेक्ट रेशिओ मिळतो. त्यामुळे, कॅज्युअल आणि कसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या गेमर्सना AAA गेम्सवर अप्रितम दृश्यात्मक अनुभव मिळतो.

कुठल्याही सुविधा आणि वैशिष्ट्यांशी तडजोड न करता हा फक्त २.३ किलो वजनाचा आजघडीला सगळ्यात हलका गेमिंग लॅपटॉप (Gamming Laptop) आहे. शाश्वत पर्यावरणाशी असलेली बांधिलकी एचपीने सातत्याने जपली आहे आणि त्यामुळे नव्या ओमेन डिव्हाइसमधील (Omen Device) काही भाग ग्राहकांनी वापरून समुद्रात फेकलेल्या प्लास्टिकपासून तसेच ॲल्युमिनीअम स्टँप्ड कव्हरचा पुनर्वापर करून तयार करण्यात आले आहेत.

गेमिंगप्रेमींसाठी खास तयार करण्यात आलेल्या संपूर्णतया नव्या ओमेन १६ मध्ये अधिक चांगला फॅन आणि विंड पाइप तंत्रज्ञानासह या वर्गातील सर्वोत्कृष्ट थर्मल्ससह अप्रतिम फ्रेमरेट मिळतो. अधिक प्रमाणातील कस्टमायझेशन पर्यायांसह तयार करण्यात आलेल्या या लॅपटॉपमध्ये नेक्स्ट जेन 11th जेन इंटेल कोअर प्रोसेसर आणि NVIDIA GeForce RTX 30 सीरिज असल्याने गेमिंग परफॉर्मन्स अधिक सुंदर होतो. गेमप्ले अनुभव अधिकच सहजसुंदर करण्यासाठी यात सर्व गेम्स 1080p आणि 60fps वर चालतात. या डिव्हाइसमध्ये 1x PCIe Gen4 SSD पर्यंतचं स्टोरेजही मिळतं.

एचपी इंडिया मार्केटचे वरिष्ठ संचालक (पर्सनल सिस्टम्स) विक्रम बेदी म्हणाले, “गेमिंग पीसी विभागात नाविन्यतेचे नेतृत्व करताना आमचा कायमच या गोष्टीवर विश्वास आहे की गेमिंग परिसंस्थेत गेमिंग परिसंस्थेतील सर्व प्रकारच्या गेमर्सना, मग ते मेनस्ट्रीम असोत, गेमिंगप्रेमी असोत की प्रोफेशनल्स, सगळ्यांना सामावून घेणारे इंजिनीअरिंग वापरले जावे. भारतातील पीसीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या गेमिंग पोर्टफोलिओला परफॉर्मन्स, डिझाइन, थर्मल आणि बॅटरी लाइफ संदर्भात या क्षेत्रातील आघडीच्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांनी नवे स्वरूप दिले आहे. नवा ओमेन १६ सादर करून आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक चांगला गेमिंग अनुभव देण्यासाठी नवे तंत्रज्ञान निर्माण करण्यात सातत्य राखले आहे.”

एचपीने नेहमीच ग्राहकांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार नाविन्यपूर्णता निर्माण करण्यावर भर दिला आहे. एचपी इंडिया गेमिंग लँडस्केप रीपोर्ट २०२१ नुसार ८९ टक्के भारतीय गेमर्सचा विश्वास आहे की स्मार्टफोनपेक्षा पीसीवर अधिक चांगला गेमिंग अनुभव मिळतो. तर ५९ टक्के प्रतिसादकर्त्यांच्या मते पीसी गेमिंग निवडण्यामागील एक कारण म्हणजे अधिक मोठा व्हिज्युअल डिस्प्ले. या सर्वेक्षणातून असेही सिद्ध झाले की सर्वेक्षणात सहभागी सर्व पीसी वापरकर्त्यांमधील एक तृतीयांश (३३ टक्के) वापरकर्ते खरेदीचा निर्णय घेताना गेमिंग फिचर्सना प्राधान्य देतात. प्रोसेसिंगचा अधिक चांगला वेग (६५ टक्के) आणि ग्राफिक्स क्षमता (64 टक्के) हे गेमिंग पीसी निवडतानाचे ग्राहकांचे महत्त्वाचे निकष आहेत.

ओमेन पोर्टफोलिओमधील या नव्या उत्पादनात खालील अनोखी वैशिष्ट्ये आहेत:

  • टॉप-टीअर परफॉर्मन्स: आता अनुभवा अप्रितम ग्राफिक्स आणि NVIDIA GeForce® RTX 3070 Laptop GPU 8 GB सह गेम्सना जणू मूर्त स्वरूप द्या. Intel Core i7-11800H3 सीरिज प्रोसेसर मोबाइल प्रोसेसरपर्यंत कंटेंट क्रश करता येईल. 16 GB DDR4 3200 MHz सह अनेक ॲप्स एकाच वेळी वापरता येतील आणि 1TB PCIe Gen 4×4 SSD मुळे महत्त्वाच्या फाइल्स विद्युत वेगाने ॲक्सेस करून गेम्सला वेग देता येईल. यात पारंपरिक SSD च्या तुलनेत दुप्पट स्टोरेज ॲक्सेस स्पीड आहे.
  • दमदार परफॉर्मन्स : अंतर्गत डिझाइनमधील एचपीच्या नाविन्यपूर्णतेने सर्व सीमारेषा ओलांडत नवी क्षमता गाठली आहे. ओमेन 156 च्या तुलनेत २.५ पट पातळ ब्लेड्स आणि ब्लेड काऊंटमध्ये २०० टक्क्यांहून अधिकची वाढ यामुळे ब्लेड्ससोबत काय करता येऊ शकते याचा नवा मापदंड रचला गेला आहे. त्यामुळे दमदार इंटरनर्ल्सच्या गरजा पूर्ण करण्यासाटी एअर फ्लो वाढला आहे. तसेच, ५२.५ Whr वरून ८३ Whr7 पर्यंत वाढलेल्या बॅटरीच्या क्षमतेमुळे गेमिंग सेशन आता कितीही वेळ चालू शकतो. यात बॅटरीचा काळ ९ तासांपर्यंतचा आहे 8.
  • ओमेन टेम्पेस्ट कुलिंग टेक्नॉलॉजी : नव्या डिव्हाईसमध्ये नव्या फॅनची डिझाइन अपग्रेड करण्यात आली आहे. हे फॅन आधीच्या जनरेशनच्या तुलनेत २.५ पट पातळ आणि फॅन ब्लेड्सची संख्या दुप्पट आहे. त्यामुळे थर्मल कार्यक्षमता लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.
  • ओमेन डायनॅमिक पॉवर टेक्नॉलॉजी: ओमेन डायनॅमिक पॉवर आणि आयआर थर्मोपाइल सेन्सर एकत्रितरित्या सीपीयू आणि जीपीयू क्षमता रीअल-टाइममध्ये ओळखून सीपीयू आणि जीपीयूमध्ये सुयोग्य पद्धतीने पॉवरचे वितरण करू शकतात. त्यामुळे अतिरिक्त हेडरूम मिळतो आणि सध्याच्या गेम सीनरीवर आधारित इन-गेम एफपीएस वृद्धिंगत होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गेम खेळताना गेमर्सना उत्कृष्ट अनुभव मिळतो.
  • अप्रतिम दृश्यात्मक अनुभव : QHD 165Hz IPS पर्यंतच्या संपूर्ण पॅनलमध्ये ३ms रिस्पॅान्स टाइम आणि १०० टक्के sRGB सह गेमप्लेचा अप्रतिम असा वेग मिळतो. ओमेन लॅपटॉप्समध्ये पहिल्यांदाच तुम्हाला अनुभवता येईल TÜVRheinlan चे आयसेफ डिस्प्ले सर्टिफिकेशन असलेले फ्लिकर फ्री आणि कलर ॲक्युरेट लो ब्लू लाइट. त्यामुळे गेमिंग सेशन कितीही काळ चालले तरी डोळ्यांना त्रास होणार नाही. कोणत्याही प्रकारच्या गेमिंग सेटअप थीमसोबत योग्य लुक मिळवण्यासाठी ओमेन गेमिंग हब लाइट स्टुडिओ इंटिग्रेशनसह यातील ठळक दृश्येत ४ झोन आरजीबी अँटी-घोस्टिंग कीबोर्डवर शिफ्ट करता येतात.
  • आयआर थर्मोपाइल सेन्सर: कोणत्याही घटकातून पॅसिव्ह इन्फ्रारेड एनर्जी शोषून घेत यातील इन्फ्रारेड थर्मोपाइल सेन्सर कोणत्याही प्रकारे थेट संबंध न येताही त्या घटकाचे तापमान मोजू शकते. आयआर थर्मोपाइल सेन्सर वापरल्यास ही प्रणाली वापरकर्त्याची सद्यस्थिती जोखून त्यानुसार थर्मल, परफॉर्मन्स आणि ॲकास्टिक ऑप्टिमायझेशन करतो आणि त्यामुळे वापरकर्त्यांना मिळतो अधिक चांगला अनुभव.
  • एचपी ओमेन १६ ची रचना आधुनिक AAA टायटल्स नियंत्रित करण्याच्या दृष्टीने खास अधिक चांगल्या फॅन डिझाइनसह आणि या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अशा थर्मल्सच्या दमदार इंटरनल सपोर्टसह करण्यात आली आहे
  • ओमेनमध्ये मिळेल अप्रतिम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अनुभव, समुद्रातून काढलेले प्लास्टिक आणि पुनर्वापरातून मिळवलेल्या मटेरिअलपासून अधिक शाश्वत पीसी डिझाइन तयार करण्यात आले आहे.

किंमत आणि उपलब्धता :

एचपी ओमेन १६ लॅपटॉप्स एचपी वर्ल्ड स्टोअर, एचपी ऑनलाइन स्टोअर आणि इतर आघाडीच्या लार्ज फॉरमॅट रीटेल आणि ऑनलाइन स्टोअर्समध्ये १३९,९९९ रु.पासून उपलब्ध आहे.