आता Harmony OS वर चालणार Huawei चे नवे स्मार्टफोन, बंद होणार Kirin चिपसेट

हुवावे ने गुगल अँड्रॉइडमधून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने अलीकडेच तिचे येणारे गॅजेट्स हारमनी ओएस वर चालणार आहेत असे एका कार्यक्रमात स्पष्ट केले होते. अमेरिकेने बॅन केल्यानंतर हुवावेने हारमनी ओएस डेव्हलप केले होते.

मुंबई : अमेरिकेने बॅन केल्यानंतर Huawei ने आपली स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम लाँच केली होती. आपल्या डिव्हाइसेजसाठी कोणा अन्य ओएसवर अवलंबून न राहण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे. हेच कारण आहे की, आता लॅपटॉपपासून ते स्मार्टफोन्सपर्यंत गुगल अँड्रॉइडवरून HarmonyOS वर शिफ्ट होणार आहे.

या डिव्हाइसेस मध्ये मिळणार HarmonyOS

हुवावे कंझ्युमर बिझनेसचे सीईओ यू चेंगडॉन्ग ने स्पष्ट केले आहे की, येणारे हुवावे स्मार्टवॉच हारमनी ओएसवर चालणार आहेत. यानंतर कंपनी अन्य डिव्हाइसेजमध्येही या ओएसचा वापर करणार आहे. या डिवाइसेजमध्ये IoT, कंप्युटर्स, टॅबलेट्स, आणि स्मार्टफोन्सचाही समावेश आहे. भविष्यात हारमनी ओएस ‘worldwide operating system’ होईल असेही चेंगडॉन्ग यांनी सांगितले.

लाँच होणार नवीन Kirin प्रोसेसर

नवीन डिव्हाइसेजमध्ये हारमनी ओएसची माहिती कंपनीने याच कार्यक्रमात दिली होती ज्यात तिने अपकमिंग हुवावे मेट 40 फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच होणार असल्याची माहिती दिली होती. हुवावे 5 सप्टेंबरला IFA 2020 मध्ये आपला फ्लॅगशिप SoC प्रोसेसर Kirin 1000 लाँच करणार आहे.

Kirin चिपसेट असलेला शेवटचा फोन असेल मेट 40

मेट40 बाबत माहिती देताना कंपनीने स्पष्ट केले की, हा हुवावेचा शेवटचा स्मार्टफोन असणार आहे जो Kirin सीरीजच्या फ्लॅगशिप चिपसेट सह येतो. अमेरिकेने बॅन केल्यानंतर हुवावे प्रोसेसरला उत्पादन घेण्यात खूप अडचणी येत असल्याने हे घडत आहे.

सेकंड जनरेशन हारमनी ओएस मेट 40 येण्याची शक्यता

कंपनी या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑपरेटिंग सिस्टिमचे सेकंड जनरेशन – HarmonyOS 2.0 ची घोषणा करण्याची शक्यता आहे असे याआधी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. ही ओएस विशेषत: कंप्युटर, स्मार्टवॉचेस आणि इतकेच नाही तर कारमध्येही वापरण्याची शक्यता आहे. तसं पाहता कंपनीचे धोरण नेमके काय आहे आणि सप्टेंबरमध्ये काय नवीन येणार आहे यासाठी काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.