कृषी पिकातून मिळणारे उत्पादन वाढविण्यासाठी नेटाफिमतर्फे फ्लेक्सी स्प्रिंकलर किट सादर

  • या नवप्रयोगाच्या माध्यमातून 2022 पर्यंत कंपनीचे 15000 हेक्टर जमीन कव्हर करण्याचे आणि भारतातील 15,000 शेतकऱ्यांपर्यंत उद्दिष्ट
  • महाराष्ट्रात अजून 20% शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आणि 4000 हेक्टर जमीन कव्हर करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे

मुंबई : भारतातील आघाडीचे स्मार्ट जलसिंचन सोल्युशन प्रदाता असलेल्या नेटाफिम इंडियातर्फे (Netafim India) फ्लेक्सी स्प्रिंकलर किट (Flexi Sprinkler Kit) ही अभिनव पद्धतीची पिकांना पाणी देणारी स्प्रिंकलर जलसिंचन सिस्टिम सादर केली आहे.

फ्लेक्सी स्प्रिंकलर किटच्या लाँचसोबत 2022 पर्यंत भारतातील 15,000 हेक्टर जमीन कव्हर करण्याचे आणि 15,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात अजून 20% शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आणि 4000 हेक्टर जमीन कव्हर करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

नेटाफिमच्या डीलर नेटवर्कच्या माध्यमातून हे किट भारतभर उपलब्ध आहे. हे उत्पादन भाज्या आणि गहू, ज्वारी, सोयाबीन, शेंगदाणे आणि अशा अनेक खुल्या जमिनीवरील पिकांसाठी उपयुक्त आहे.

फ्लेक्सी स्प्रिंकलर किटमध्ये फ्लेक्सनेट पाइप आणि डी-नेट स्प्रिंकलर युनिट समाविष्ट आहे. शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीनुसार हे दोन्ही घटक शेतकऱ्यांच्या गरजेनुसार कस्टमाइझ करता येऊ शकतात. हे अभिनव उत्पादन छोट्या तसेच मोठ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे, ज्यांना आपल्या पिकांना एकसमान पाणी द्यायचे आहे आणि दीर्घकालीन कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

फ्लेक्सी स्प्रिंकलर किट हे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच उत्पादन आहे आणि त्याला भक्कम असा डी-नेट थ्रीडी डिफ्युजन आर्म आहे, ज्याने मोठ्या प्रमाणावरील लागवडीखालील जमिनीसाठी एकसमान पद्धतीने पाणी वितरणाची खातरजमा होते. अतिनील किरणांना प्रतिबंध करणाऱ्या घटकांपासून तयार करण्यात आलेल्या आणि सर्व प्रकारच्या वातावरणात तग धरून राहणाऱ्या या यंत्रामुळे या उत्पादनाच्या संपूर्ण कार्यकाळात विनाअडथळा काम होते आणि त्यामुळे ते टिकाऊ होते. या किटमध्ये फ्लेक्सीनेट सुद्धा आहे. या बहुउपयोगी पाइपिंग सिस्टिममध्ये वाहून नेण्याची क्षमता आणि सुविधा आहे. त्यामुळे ही यंत्रणा स्मार्ट व शाश्वत पाणी वाहून नेण्याची यंत्रणा पुरवते. या उत्पादनाचे कमी वजन व भक्कमपणा यामुळे शेतकऱ्यांसाठी हे उपकरण बसवणे व त्याचा वापर करणे अत्यंत उपयुक्त होऊन जाते, हे याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ते शेतात सहज बसवता व काढता येते.

पाण्याचा दाब व पिकाची गरज या नुसार स्प्रिंकलर नोझल्समधील अंतर वेगवेगळे ठेवता येण्याची लवचिकता ही यंत्रणा देते. या व्यतिरिक्त, या उत्पादनाला जागेची आवश्यकता फार नसल्याने वापरानंतर हे कॉम्पॅक्ट सोल्यूशन सहज काढता येऊ शकते आणि घरीसुद्धा ठेवता येऊ सकते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ते टिकाऊ व देखभालीच्या खर्चात बचत करणारे हे उत्पादन आहे. नेमके व जल-सक्षम वितरणामुळे पिक उगवण्यासाठी आणि बागेला थंड करण्यासाठीही हा आदर्श उपाय आहे.

या लाँचबद्दल नेटाफिम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रणधीर चौहान म्हणाले, “भारतातील कृषी क्षेत्रामध्ये अजूनही पारंपरिक दृष्टिकोन आणि जुन्या शेती प्रचलित आहेत. त्यामुळे शाश्वततेसह व्हॉल्यमेट्रिक टार्गेटसह सक्रियतेने निश्चित करण्यासाठी व सादर करण्यासाठी आम्हाला संधी आहे ज्याने शेतकऱ्यांची आजच्या आधुनिक पद्धतीसह प्रगती करण्याची क्षमता वाढेल. शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सोल्यूशन्स तयार करण्यासाठी आणि जागतिक पातळीवर असलेल्या पाणीटंचाइशी लढा देण्यासाठी नेटाफिममध्ये आम्ही सतत प्रयत्नशील असतो. भारतीय शेतकऱ्यांसाठी पोर्टेबल ड्रिप किट सादर केल्यानंतर फ्लेक्सी स्प्रिंकलर किट लाँच करता आम्ही अत्यंत उत्साहात आहोत. विविध प्रकारच्या पिकांसाठी शेती सुलभ करण्याच्या उद्दिष्टावर हे उत्पादन केंद्रीत आहे. ही सिस्टिम अत्यंत हुशारीने आणि कार्यक्षमतेने तुलनेने कमी पर्जन्य जल दरासह डिझाइन करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना एकसमान जल वितरण आणि वापरण्यास सुलभ यंत्रणा हवी आहे त्यांच्यासाठी या तंत्रज्ञानाने अत्यंत रोमांचक नवी साधने उपलब्ध करून दिली आहेत.”

पहा व्हिडिओ :