पबजी ग्लोबल चॅम्पियनशिप : आजपासून ३२ टीममध्ये होणार महामुकाबला, १३ कोटींपेक्षा अधिक पैशांचा पडणार पाऊस, पिछाडीवर राहिलात तरी सात लाख पक्के

या चॅम्पियनशीपमध्ये जगभरातील ३२ टीम सहभागी होणार आहेत. या सर्व ३२ टीमना १३.८३ कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. यातील पहिल्या ते सोळाव्या क्रमांकावर जिंकलेल्या टीमना वेगवेगळे पैसे मिळणार आहेत. तर १७ ते २०, २१ ते २४ आणि २५ ते ३२ क्रमांकावर राहणाऱ्या टीमना वेगवेगळी रक्कम मिळणार आहे.

    मुंबई : पबजी (PUBG) खेळण्यासाठी जगभरातील लोकं वेडी आहेत. हा खेळ खेळण्यासाठी महिनाभरात ५२ कोटींपेक्षा जास्त प्लेयर्स एक्टिव्ह (Players Active) असतात. पबजीच्या डेली युझर्सची (Daily Users) संख्या ४ कोटींच्या घरात आहे. या सर्व प्लेअर्ससाठी हा गेम तयार केलेल्या क्राफ्टन (Krafton) या कंपनीने पबजी ग्लोबल चॅम्पियनशीप (PUBG Global Championship) आणले आहे. ही स्पर्धा आजपासून सुरु होणार असून १९ डिसेंबरला संपणार आहे. सगळ्या प्रमुख वेबसाईटवर याचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे.

    ३२ टीमना जवळपास १.८ दशलक्ष डॉलर्सची बक्षिसे

    या चॅम्पियनशीपमध्ये जगभरातील ३२ टीम सहभागी होणार आहेत. या सर्व ३२ टीमना १३.८३ कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. यातील पहिल्या ते सोळाव्या क्रमांकावर जिंकलेल्या टीमना वेगवेगळे पैसे मिळणार आहेत. तर १७ ते २०, २१ ते २४ आणि २५ ते ३२ क्रमांकावर राहणाऱ्या टीमना वेगवेगळी रक्कम मिळणार आहे. वीकली फायनलमध्ये सुपर पाँईंट रुल फॉलो करण्यात येणार आहे.

    या स्पर्धेची ग्रँड फायनल तीन दिवस चालणार आहे. यात प्रत्येक दिवशी पाच मॅच होणार आहेत. विजयी ठरलेल्या टीमच्या सर्व प्लेअर्सना कोरियाच्या पॅरेडाईज शहराची यात्रा घडवून आणण्यात येणार आहे. तिथे प्रत्येकाला किमान २ दशलक्ष डॉलर्सची बक्षीसे देण्यात येणार आहे. कोरोनामुळे २०२०ची फायनल रद्द करण्यात आली होती. आता परिस्थिती नियंत्रणात येत असताना पबजी गेमिंगचा मार्गही मोकळा होताना दिसतो आहे.

    प्रत्येक प्लेअरवर रेफरीची नजर

    यंदाच्या टुर्नामेंटच्या फॉरमॅटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ही स्पर्धा लॅन, ऑनलाईन हायब्रहिड सिस्टिमवर काम करेल. पाच टीम चीनमधून सहभागी होणार आहेत, तर इतर टीम स्पर्धेच्या आयोजन ठिकाणी सहभागी असतील. या स्पर्धेत सर्व टीम एकत्र याव्यात असा विचार होता, पण व्हीसा न मिळाल्याने कोरिया आणि चीन या दोन्ही ठिकाणी ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेच्या काळात ई स्पोर्ट्स रेफकीची प्रत्येक प्लेअरवर नजर असणार आहे.

    सर्वात कमी रँकिंग असणाऱ्या टीमलाही मिळणार ७ लाख

    स्पर्धेत सर्वाधिक किल करणाऱ्या प्लेअरला १०,००० डॉलर्स आणि २०,००० डॉलर्सचा इम्प्रेसिव्ह अवॉर्ड देण्यात येणार आहे. सर्वात कमी रॅकिंग असणाऱ्या प्लेअरलाही १० हजार डॉलर्स म्हणजेत ७.४४ लाख रुये मिळणार आहेत. या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रिमिंग, पबजीच्य् ऑफिशियल वेबसाईट आणि ट्विटरवर करण्यात येणार आहे.