PVR कडून अधिक सुरक्षिततेसह मनोरंजनाचा आनंद देणारी सुविधा; ICMR मान्‍यताकृत प्रयोगशाळेमध्‍ये चाचणी करण्‍यात आलेली क्रांतिकारी ॲण्‍टी-व्‍हायरल सिनेमा एअर प्‍युरिफिकेशन सिस्टिम लाँच

हे डिवाईस त्रिवंद्रम येथील ICMR मान्‍यताप्राप्‍त व ILC मान्‍यताप्राप्‍त लॅब (इंटरनॅशनल) राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्‍नोलॉजी येथे सार्स कोविड-२ विषाणूवर यशस्‍वीरित्‍या चाचणी करण्‍यात आले आहे. तसेच हे डिवाईस विशेषत: चित्रपटगृहांसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.

  • भारतभरातील चित्रपटगृहांमध्‍ये रिअल-टाइम इनडोअर हवा निर्जंतुकीकरणासाठी क्रांतिकारी निगेटिव्ह आयन तंत्रज्ञानाने सुसज्‍ज भारताची पहिली सिनेमा साखळी

नवी दिल्ली : PVR Ltd या भारतीय चित्रपट प्रदर्शन उद्योगक्षेत्रातील अग्रणी कंपनीने युएफओ मूव्‍हीज (UFO Movies) सोबत सहयोग करत सिनेमा-संबंधित हवा निर्जंतुकीकरण डिवाईस ‘युएफओ-वोल्‍फ एअरमास्‍क'(UFO-Wolf Airmask) च्‍या इन्‍स्‍टॉलेशन (Installation) ची घोषणा केली आहे. चित्रपटगृहामध्‍ये येणाऱ्या प्रेक्षकांच्‍या सुरक्षिततेच्‍या खात्रीसाठी हे डिवाईस रिअल-टाइम हवा निर्जंतुकीकरणाची सुविधा देत आहे, ज्‍यामुळे हवेतील, तसेच पृष्‍ठभागांवरील सर्व प्रकारचे घातक जीवाणू, विषाणू व सूक्ष्‍मजीवांपासून सुरक्षिततेची खात्री मिळते.

हे डिवाईस त्रिवंद्रम येथील ICMR मान्‍यताप्राप्‍त व ILC मान्‍यताप्राप्‍त लॅब (इंटरनॅशनल) राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्‍नोलॉजी येथे सार्स कोविड-२ विषाणूवर यशस्‍वीरित्‍या चाचणी करण्‍यात आले आहे. तसेच हे डिवाईस विशेषत: चित्रपटगृहांसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. अभिनेता-निर्माता जॉन अब्राहम यांच्‍या उपस्थितीत पीव्‍हीआर Juhu, मुंबई येथे हे उत्‍पादन लाँच करण्‍यात आले. यावेळी त्‍यांचा आगामी चित्रपट ‘सत्‍यमेव जयते २’चे प्रमोशन देखील करण्‍यात आले.

राष्‍ट्रीय स्‍तरावर चित्रपटगृहे पुन्‍हा सुरू झाली असून विविध राज्‍ये आसनक्षमतेवरील निर्बंध शिथील करत आहेत आणि इतर देखील लवकरच यामध्‍ये सामील होण्‍याची अपेक्षा आहे. देशामध्‍ये महामारीचा प्रादुर्भाव देखील जवळपास नियंत्रणात आला आहे आणि प्रेक्षक मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्‍याचा अनुभव पुन्‍हा एकदा घेण्‍यास सुरूवात करत असून विविध कन्‍टेन्‍ट सादर केले जाणार आहेत.

पीव्‍हीआर सिनेमाज देशभरातील त्‍यांच्‍या चित्रपटगृहांमध्‍ये हे युनिट्स इन्‍स्‍टॉल करणारे भारतातील पहिले मल्‍टीप्‍लेक्‍स बनले आहे. तसेच ते सरकारने जारी केलेल्‍या प्रमाणित सुरक्षितताविषयक नियमांचे पालन करत प्रेक्षकांसाठी चित्रपट पाहण्‍याचा अनुभव सुरक्षित करत आहे. त्‍यांच्‍या सर्व कर्मचाऱ्यांचे १०० टक्‍के लसीकरण पूर्ण झाले आहे. हे डिवाईस ऑडिटोरियम्‍स, लॉबीज व वॉशरूम्‍समध्‍ये इन्स्टॉल करण्‍यात येईल.

तंत्रज्ञानाचा अवलंब हे पीव्‍हीआर केअर्स उपक्रमाचे विस्‍तारीकरण आहे. या उपक्रमामध्‍ये कोविड-१९ नंतरच्‍या विश्‍वासाठी सुधारित सुरक्षितताविषयक उपाय व प्रक्रियांचा समावेश असून त्‍याद्वारे प्रेक्षक व कर्मचा-यांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍याची काळजी घेतली जाते. सिनेमा एक्झिबिशन सेक्‍टरला मोठा फटका बसला आहे आणि या अनपेक्षित काळादरम्‍यान कंपनी त्‍यांचे कर्मचारी, ग्राहक व समुदायांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍याच्‍या सुरक्षिततेला मोठ्या प्रमाणात प्राधान्‍य देत आली आहे आणि जबाबदारी व केअरसह व्‍यवसाय कार्यसंचालने सुरू ठेवली आहेत. विभाग अग्रणी म्‍हणून पीव्‍हीआरने पुढाकार घेत चित्रपटगृहे प्रेक्षक व कर्मचा-यांसाठी सुरक्षित असण्‍याची खात्री घेतली आणि सरकारने जारी केलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. बॉक्स ऑफिस, सिक्युरिटी, लॉबी, ऑडी, कन्सेशन, रेस्ट रूम आणि एक्झिट पासून ग्राहकांच्या मनोरंजनाच्‍या प्रवासामधील प्रत्येक टच पॉइंटवर सुरक्षितता व स्वच्छता मापदंड पीव्‍हीआर केअरमध्ये आहेत.

तंत्रज्ञानाने चित्रपटगृहांना अधिक सुरक्षित बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे- जसे सर्वाधिक स्पर्श झालेल्या पृष्ठभागावर अँटी-मायक्रोबायल फिल्मचा वापर, सर्व अन्‍न पॅकेजिंग निर्जंतुक करण्यासाठी यूव्ही कॅबिनेटचा वापर, एनएफसी, ई-वॉलेट्स या माध्‍यमातून सक्षम डिजिटल व्यवहार, क्‍यूआर कोड एण्‍ट्रीच्‍या माध्‍यमातून पेपरलेस चित्रपट तिकीट खरेदी.

पीव्‍हीआरने आपली चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्यापूर्वी स्वतःच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले. तसेच कंपनीने चित्रपटसृष्‍टीसाठी उत्‍प्रेरक बनण्‍यामध्‍ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली. कंपनीने फेडरेशन ऑफ वेस्‍टर्न इंडिया सिने इम्‍प्‍लॉजीजसह (एफडब्‍ल्‍यूआयसीई) नोंदणीकृत चित्रपटांमधील स्‍पॉट-बॉईज, लाइट-मेन इत्‍यादी वंचित रोजंदारी कामगारांना त्‍यांच्‍या चित्रपटगृहांमध्‍ये मोफत लसीकरणाची सुविधा दिली.

या उपक्रमाबाबत बोलताना पीव्‍हीआर लिमिटेडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गौतम दत्त म्‍हणाले, ”जबाबदार कंपनी म्‍हणून आम्‍ही आमचे प्रेक्षक व कर्मचा-यांच्‍या स्‍वास्‍थ्‍यासाठी सर्व आरोग्‍य व सुरक्षितताविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहोत. आम्‍हाला आमच्‍या नवीन तंत्रज्ञान अवलंब उपक्रमांचा भाग म्‍हणून आमच्‍या चित्रपटगृहांमध्‍ये युएफओ-वोल्‍फ एअरमास्‍कच्‍या इन्‍स्‍टॉलेशनसाठी युएफओ मूव्‍हीजसोबत विशेष सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. या डिवाईसला शक्‍ती देणा-या क्रांतिकारी तंत्रज्ञानामधून सुरक्षितता व आरामदायीपणाला उच्‍च महत्त्व देणारे आमचे तत्त्व दिसून येते. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आम्‍हाला विश्‍वास आहे की आम्‍ही आमच्‍या प्रेक्षकांना सुरक्षित वातावारणाची खात्री देऊ, ज्‍याअंतर्गत चित्रपटगृह त्‍यांचे चित्रपट पाहण्‍याचा नेहमीसारखा आनंद देतील.”

युएफओ-वोल्‍फ एअरमास्‍कमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आहे, जे बंदिस्‍त जागेमधील हवानिर्मित विषाणूंना दूर करते. यामधील नॉन-केमिकल निगेटिव्‍ह आयन जनरेशन आरोग्‍य व उत्‍साह वाढवते आणि सर्वांगीण व २४×७ तास संरक्षण देते. नॉन-‍केमिकल निगेटिव्‍ह आयन जनरेशन पर्वत, धबधबे व समुद्रकिनारे येथे आढळून येते.

हे उत्‍पादन प्रतिसेकंद प्रति घनसेंटिमीटर जवळपास १०० ट्रिलियन निगेटिव्‍ह आयन्‍स उत्‍सर्जित करू शकते, जे पृष्‍ठभागावरील प्रोटीन/ कोरोनाव्‍हायरसचे स्‍पाइक प्रोटीन किंवा हवेमध्‍ये असलेले इतर कोणतेही घातक विषाणू व सूक्ष्‍मजीवांना आकर्षून घेत त्‍यांना न्‍यूट्रिलाइज करतील. तसेच ते १५ मिनिटांच्‍या आत ९९ टक्‍के सार्स कोविड-२ विषाणूला न्‍यूट्रीलाइज करू शकते. रिअल टाइम इनडोअर एअर स्‍टरिलायझेशन बंदिस्‍त जागांमधील शुद्ध हवेसाठी अविषारी नॉन-अ‍ॅलर्जीक सूक्ष्‍मजीवांना न्‍यूट्रीलायइज करते. हे उत्‍पादन चित्रपट सुरू असताना देखील वापरता येते, ज्‍यामधून जलद टर्नअराऊंडची खात्री मिळते. म्‍हणून हे उत्‍पादन मोठ्या चित्रपटगृहांच्‍या निर्जंतुकीकरणासाठी परिपूर्ण व दीर्घकालीन सोल्‍युशन आहे.

सार्स कोव्‍ह-२ विषाणूच्‍या स्‍पाइक प्रोटीन्‍ससंदर्भात परिणामकारकतेसाठी विविध संस्‍थांनी या उत्‍पादनाची चाचणी व सत्‍यापन केले आहे. यामध्‍ये दुबई सेंट्रल लॅब, एसजीएस केमिकल सोल्‍यूशन्‍स लॅबोरेटरीज, एन्‍व्‍हरोडिझाइन्‍स इको लॅब्‍स, बीसाइड्स, सीई व आरओएचएस डिरेक्टिव्‍ह ऑफ युरोपियन पार्लिमेंट या संस्‍थांनी ईयू आरोग्‍य, सुरक्षितता व पर्यावरण सुरक्षितता मानकांसह उत्‍पादनांच्‍या अनुकूलतेबाबत पुष्‍टी दिली आहे.

या सहयोगाबाबत बोलताना युएफओ मूव्‍हीज इंडिया लि.चे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक कपिल अग्रवाल म्‍हणाले, ”दशकापासून पीव्‍हीआरसोबत आमचा सहयोग आहे. आम्‍ही त्‍यांच्‍या स्क्रीन्‍सना डिजिटल संरक्षण देण्‍यासाठी त्‍यांच्‍यासोबत सहयोग केला. आम्‍हाला भारतातील आघाडीची सिनेमा साखळी पीव्‍हीआरच्‍या माध्‍यमातून देशभरातील चित्रपटगृहांमध्‍ये युएफओ-वोल्‍फ एअरमास्‍क हे क्रांतिकारी तंत्रज्ञान सादर करण्‍याचा आनंद होत आहे. कोविड महामारीमुळे चित्रपट पाहण्‍याच्‍या अनुभवामध्‍ये व्‍यत्‍यय आला आहे आणि चित्रपटगृहांना त्‍यांच्‍या प्रेक्षकांचा आत्‍मविश्‍वास पुन्‍हा मिळवण्‍याचे सर्वात मोठे आव्‍हान आहे. फ्युमिगेशन व सॅनिटायझेशन सारखे सुरक्षितताविषयक प्रोटोकॉल्‍स या सार्वजनिक जागांचे निर्जंतुकीकरण करण्‍यासाठी पुरेसे नाहीत आणि या भागांमध्‍ये वाहणा-या हवेचे निर्जंतुकीकरण करण्‍याची गरज आहे. सुरक्षित व आरोग्यदायी वातावरणामुळे प्रेक्षकांना कोणत्‍याही भितीशिवाय चित्रपट पाहण्‍याचा आनंद घेता येईल. या उत्‍पादनाच्‍या कार्यक्षमतेची प्रतिष्ठित शासकीय प्रयोगशाळांकडून चाचणी व प्रमाणन करण्‍यात आले आहे.”

युएफओ मूव्‍हीजने विशेष आधारावर भारतातील चित्रपटगृहांमध्‍ये त्‍यांच्‍या उत्‍पादनाच्‍या वितरणासाठी कोची-स्थित तंत्रज्ञानाला चालना देणारी कंपनी ऑलअबाऊट इनोव्‍हेशन्‍स प्रा. लि.सोबत देखील सहयोग केला आहे. मेक-इन-इंडिया उपक्रमाचा भाग म्‍हणून युएफओ-वोल्‍फ एअरमास्‍क भारतामध्‍ये डिझाइन व उत्‍पादित करण्‍यात आले आहे आणि हे युनिट्स देशभरातील सर्व पीव्‍हीआर चित्रपटगृहांमध्‍ये, तसेच आगामी प्रॉपर्टीजमध्‍ये इन्‍स्‍टॉल करण्‍यात येतील.

उत्‍पादनाबाबत सविस्‍तर माहिती सांगताना ऑलअबाऊट इनोव्‍हेशन्‍स प्रा.लि.चे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुजेश सुगुनन म्‍हणाले, ”चित्रपटगृहामध्‍ये वोल्‍फ एअरमास्‍क बनवण्‍यात आल्‍यानंतर चित्रपटगृहामधील हवा क्षणात विषाणू, जीवाणू, धूळ व दुर्गंधीचे न्‍यूट्रीलाइज करण्‍याची खात्री मिळेल. अविषारी व नॉन-अ‍ॅलर्जीक मायक्रोबायल न्‍यूट्रिलायझर सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी अत्‍यंत सुरक्षित वातावरण देते. हे उत्पादन बंदिस्‍त जागांमध्‍ये श्‍वास घेता येऊ शकेल अशा शुद्ध हवेची खात्री देते आणि वातानुकूलित स्थितीमध्‍ये देखील उत्तम काम करते. भारताच्‍या पहिल्‍या आयन आधारित कोविड सोल्‍यूशनच्‍या माध्‍यमातून आसपासचा परिसर सुरक्षित करण्‍यासाठी हे परिपूर्ण सोल्‍युशन आहे.”