सुपरस्टार रणवीर सिंग आणि अल्लु अर्जुनसह रॅपिडोची जाहिरात मोहीम

ही ६ आठवड्यांची मोहीम एचएसएम आणि बिगर-एचएसएम बाजारपेठांसाठी प्रत्येकी दोन फिल्म्स प्रदर्शित करणार आहे. सिझिल श्रीवास्तव (एचएसएम) आणि त्रिविक्रम श्रीनिवास (नॉन-एचएसएम) यांनी या फिल्म्सचे दिग्दर्शन केले असून ड्रीम व्हॉल्ट मीडियाद्वारे त्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

    मुंबई : भारताचे सर्वात वेगाने विस्तारणारे बाइक टॅक्सी ॲप (Bike Taxi App) रॅपिडोने (Rapido) नुकतीच आपली पहिली सेलिब्रिटी जाहिरात मोहीम ‘स्मार्ट हो, तो रॅपिडो’ची घोषणा केली. स्वत:ला एक ग्राहककेंद्री ब्रॅण्ड म्हणून प्रस्थापित करणे आणि लोकांना या ब्रॅण्डद्वारे मिळणाऱ्या प्रमुख सेवा व युएसपी अर्थात खास वैशिष्ट्यांविषयी माहिती करून देणे हा रॅपिडोचा (Rapido) या मोहिमेमागचा धोरणात्मक हेतू आहे. बाजारपेठेमध्ये आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या तसेच दैनंदिन प्रवास अधिक सुलभ बनविण्याच्या हेतूने आपल्या अनोख्या सेवांविषयी लोकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी कंपनीने यावेळी प्रथमच चित्रपटांतील सुपरस्टार्सना आपल्या जाहिरातीसाठी करारबद्ध केले आहे.

    ही ६ आठवड्यांची मोहीम एचएसएम आणि बिगर-एचएसएम बाजारपेठांसाठी प्रत्येकी दोन फिल्म्स प्रदर्शित करणार आहे. सिझिल श्रीवास्तव (एचएसएम) आणि त्रिविक्रम श्रीनिवास (नॉन-एचएसएम) यांनी या फिल्म्सचे दिग्दर्शन केले असून ड्रीम व्हॉल्ट मीडियाद्वारे त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अल्लु अर्जुन (Allu Arjun) या सुपरस्टार्सचा सहभाग असलेली जाहिरात देशभरातील ओओएच (आउट ऑफ होम), रेडिओ, टीव्ही आणि डिजिटल मंचावर प्रदर्शित होणार असून त्यात देशातील १४ शहरांवर भर देण्यात आला आहे.

    रॅपिडोच्या (Rapido) मार्केटिंग विभागाचे प्रमुख अमित वर्मा म्हणाले, “रणवीर सिंग आणि अल्लु अर्जुन यांच्यासोबत आमचे पहिले सेलिब्रेटी कॅम्पेन लोकांसमोर आणत असल्याचा आम्हाला आननंद आहे. रॅपिडोचा वापर प्रवासाचे पर्यायी तरीही नियमितपणे वापरण्याजोगे साधन म्हणून करण्याची कल्पना सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये रुजविण्यास आणि परवडण्याजोग्या व सोयीस्कर दैनंदिन प्रवासाचे एक नवे युग सुरू करण्यास हे दोन्ही उत्कृष्ट अभिनेते आमची मदत करतील.”

    बॉलिवुड सुपरस्टार रणवीर सिंग म्हणाला, “रॅपिडोसोबत (Rapido) काम करत असल्याचा मला आनंद आहे. आमची ही पहिलीच जाहिरात मोहीम एकत्रितपणे करण्याचा हा अनुभव मला खरोखरंच खूप आवडला. या जाहिरातपटासाठी शूटिंग करणे, आपला अनोखा अंदाज आणि अगदी अस्सल शैली असणा-या बब्बनचे वैशिष्ट्यपूर्ण पात्र रंगविणे माझ्यासाठी आल्हाददायक होते. रॅपिडो बाजारपेठेत नवी लहर आणण्यासाठी सज्ज आहे आणि खात्रीने यशस्वी ठरू शकेल, अशा एका प्रयत्नामध्ये मी आपले योगदान देत आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.”