Jio Phone Next चा धिंगाणा, मिळतोय जबरदस्त रिस्पॉन्स, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या किंमत-फीचर्स-EMI प्लॅन्स

काही लोकांना Jio Phone Next Price 6499 रुपये जास्त असल्याचे दिसत होते, परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार, रिलायन्स रिटेलने सांगितले की, केवळ शहरी भागातीलच नाही तर ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांकडूनही, तसेच ग्रामीण भागात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  मुंबई : मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) Reliance Jio आणि Google या दोन्ही कंपन्यांनी मिळून JioPhone Next तयार केला आहे. JioPhone Next बाजारात येताच या फोनला (Cheapest Reliance 4G Smartphone) ग्राहकांकडून खूप चांगला रिस्पॉन्स मिळू लागला आहे आणि हा रिस्पॉन्स किरकोळ विक्रेते आणि ग्राहक दोघांकडून मिळत आहे. ही माहिती रिलायन्स रिटेलनेच दिली आहे, जी या उपकरणाच्या विक्रीवर लक्ष ठेवून आहे.

  लाँच झाल्यानंतर, काही लोकांना Jio Phone Next Price 6499 रुपये जास्त असल्याचे दिसत होते, परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार, रिलायन्स रिटेलने सांगितले की, केवळ शहरी भागातीलच नाही तर ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांकडूनही, तसेच ग्रामीण भागात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रिलायन्स रिटेलने इकॉनॉमिक टाइम्सला दिली आहे. पुढे असे सांगण्यात आले आहे की, सध्या मार्केटमध्ये असा कोणताही फोन नाही जो 1999 रुपयांच्या डाऊन पेमेंटसह उपलब्ध आहे आणि ग्राहकांना हाच फोन आवडला आहे.

  Jio Phone Next Features

  • 5.45-इंचाचा HD+ डिस्प्ले,
  • Qualcomm Snapdragon 210 प्रोसेसर
  • Speed आणि मल्टीटास्किंगसाठी Pragati OS
  • फोनच्या मागील पॅनलवर, 13-Mega Pixel चा रियर कॅमेरा
  • 10 W Fast Charging Support सह 3500 mAh बॅटरी

  Jio Phone Next Price in India

  या Cheapest 4G Smartphone ची किंमत 6499 रुपये निश्चित करण्यात आली आहे, जी 1999 रुपयांचे डाऊन पेमेंट करून देखील खरेदी केली जाऊ शकते आणि उर्वरित रकमेसाठी तुम्ही EMI ही करू शकता.