PVR कडून चित्रपटगृहामधील हवा सर्व विषाणूंपासून ९९.९ टक्‍के सुरक्षित करणाऱ्या क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा वापर

चित्रपटगृहांमधील प्रमुख ठिकाणी, तसेच अतिथी अधिक वेळ व्‍यतित करणाऱ्या ऑडिटोरियम्‍समध्‍ये निगेटिव्‍ह आयन जनरेटर डिवाईसेस इन्‍स्‍टॉल करण्‍यात आले आहेत. पीव्‍हीआर या तंत्रज्ञानाचा अवलंब करणारी जगातील पहिली व एकमेव सिनेमा साखळी आहे.

  मुंबई : पीव्‍हीआर सिनेमाज (PVR Cinemas) आपल्‍या अतिथींच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी आणि कोविड विषाणू (Corona Virus) सह नवीन व्‍हेरिएण्‍ट्सशी (Varient) संबंधित कोणत्‍याही समस्‍येचे निराकरण करण्‍यासाठी अथक मेहनत घेत आहे. याकरिता त्‍यांनी क्रांतिकारी आयन तंत्रज्ञानाचा (Revolutionary Ion Technology) वापर केला आहे, जे ९९.९ टक्‍के हवानिर्मित विषाणूंना निष्क्रिय करते.

  चित्रपटगृहांमधील प्रमुख ठिकाणी, तसेच अतिथी अधिक वेळ व्‍यतित करणाऱ्या ऑडिटोरियम्‍समध्‍ये निगेटिव्‍ह आयन जनरेटर डिवाईसेस इन्‍स्‍टॉल करण्‍यात आले आहेत. पीव्‍हीआर या तंत्रज्ञानाचा अवलंब करणारी जगातील पहिली व एकमेव सिनेमा साखळी आहे.

  हे चित्रपटगृहांसाठी डिझाइन करण्यात आलेले एकमेव डिवाईस आहे आणि आयसीएमआर प्रमाणित व दुबई सेंट्रल लॅब्‍समध्‍ये सार्स कोविड-२ विषाणूवर यशस्‍वीरित्‍या चाचणी करण्‍यात आले आहे. हे डिवाईस प्रतिसेकंद प्रति घनसेमी जवळपास १०० ट्रिलियन निगेटिव्‍ह आयन्‍स उत्‍सर्जित करणाऱ्या नॉन-केमिकल निगेटिव्‍ह आयन जनरेटरचा वापर करत रिअल-टाइममध्‍ये हवेचे निर्जंतुकीकरण करते.

  हे नवीन तंत्रज्ञान पीव्‍हीआरचा सुधारित सुरक्षितता उपक्रम ‘पीव्‍हीआर केअर्स’चा भाग आहे, ज्‍यामधून चित्रपटगृहे चित्रपट पाहण्‍याचा आनंद देण्‍यासोबत अतिथी व कर्मचा-यांसाठी प्रत्‍येक टच पॉइण्‍टवर सुरक्षित असण्‍याची खात्री मिळते.
  कंपनी सरकारने जारी केलेली स्‍वच्‍छताविषयक नियम व उपायायोजनांचे काटेकोरपणे पालन करत आहे आणि महामारीनंतरच्‍या विश्‍वामध्‍ये देखील चित्रपटप्रेमींना काही संस्‍मरणीय क्षणांचा आनंद देण्‍यासोबत उपाययोजना राबवत आहे.

  चित्रपटगृहांना सुरक्षित करण्‍याबाबत सांगताना पीव्‍हीआर लिमिटेडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. गौतम दत्त म्‍हणाले, ”देशामध्‍ये स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे आणि प्रेक्षक पुन्‍हा मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्‍याचा आनंद घेण्‍यासाठी परतत आहेत, ज्‍याला प्रबळ कंटेंटचा पाठिंबा देखील मिळत आहे. आमच्‍यासाठी हा अत्‍यंत हृदयस्‍पर्शी विकास आहे आणि यामधून दिसून येते की, आमचे अतिथी अवलंबण्‍यात आलेल्‍या सुरक्षितताविषयक उपाययोजनांबाबत समाधानी आहेत. पण अजूनही सुरक्षितता कारणास्‍तव काही ग्राहक मोठ्या पडद्यापासून दूर राहत आहेत आणि या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्‍याने आम्‍हाला त्‍यांच्‍या समस्‍यांचे निराकरण करण्‍यामध्‍ये मदत होत आहे.”