
सध्या iOS वर या फीचरची टेस्टिंग सुरू आहे. ट्विटरने सांगितले की, आम्ही सध्या iOS ॲपसाठी ट्विटरवर ऑडिओ मेसेज ट्विट करण्याच्या फीचरची चाचणी करत आहोत. यामुळे तुम्हाला तुमच्या आवाजाने चालता-फिरता ट्विट करणे शक्य होईल. तसेच त्यात ऑटोमेटेड कॅप्शन (Automated Captions) देखील देण्यात येणार आहेत.
मुंबई : सध्या सोशल मीडिया ॲप्स म्हणजेच मेटा (फेसबुक), इन्स्टाग्राम आणि ट्विटर हे ॲप्स आता केवळ मनोरंजनापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत तर युजर्ससाठी आता हे ॲप्स पैसेही कमावण्याचं साधन झालं आहे. ट्विटर (Twitter) आता आपल्या प्लॅटफॉर्मसाठी व्हाट्सएपवर (Whatsapp) लोकप्रिय ठरलेले ऑडिओ मेसेज फीचर (Audio Message Feature) टेस्ट करत आहे . आतापर्यंत युजर्स त्यांचे ट्विट ट्विटरवर पोस्ट करू शकत होते पण आता ते ऑडिओ संदेश देखील ट्विट करु शकणार आहेत.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्या iOS वर या फीचरची टेस्टिंग सुरू आहे. ट्विटरने सांगितले की, आम्ही सध्या iOS ॲपसाठी ट्विटरवर ऑडिओ मेसेज ट्विट करण्याच्या फीचरची चाचणी करत आहोत. यामुळे तुम्हाला तुमच्या आवाजाने चालता-फिरता ट्विट करणे शक्य होईल. तसेच त्यात ऑटोमेटेड कॅप्शन (Automated Captions) देखील देण्यात येणार आहेत.
कंपनीने सांगितले की, ट्विटर व्हॉईस ट्विट ऑडिओ अटॅचमेंटसह पब्लिश केले जातील, जेणेकरून लोकांना ते सहजपणे ऐकता येईल. जेव्हा आयफोन वापरकर्ते या फाईलवर टॅप करतात, तेव्हा ती ऑटोमॅटिक मिनीमाईज केली जाईल आणि प्ले होईल. याशिवाय, ट्विटर स्क्रोल केल्यानंतर किंवा ॲपमधून बाहेर पडल्यानंतरही तुम्ही ते ऐकू शकाल.
असा रेकॉर्ड करा ट्विटर ऑडिओ मेसेज
iOS डिव्हाइसवर Twitter उघडा आणि कम्पोज ट्विट वर टॅप करा
त्यानंतर व्हॉइस आयकॉनवर टॅप करा, मेसेज रेकॉर्ड करण्यासाठी लाल बटणावर टॅप करा
रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर डन वर क्लिक करा
आता तुम्हाला twitter टेक्स्ट किंवा एकापेक्षा जास्त ट्वीट ट्विट करण्याचा ऑप्शन मिळेल
तुम्ही 2.20 मिनिटांपेक्षा जास्त वेळेचा मेसेज रेकॉर्ड करू शकणार नाही.
असे प्ले करा ऑडिओ मेसेज ट्विट
ट्विट ऐकण्यासाठी आधी twitter वर जा
व्हॉइस ट्विट ऐकण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा
टॅप केल्यानंतर व्हॉइस ट्विट प्ले होईल