google phones

गुगल पिक्सेल 8 कदाचित चार वेगवगेळ्या तर गुगल पिक्सेल 8 प्रो तीन रंगांमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

    गुगलने (Google Phones) आपल्या पुढील जनरेशनमधील फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 8 (Pixel 8) सीरिजच्या अधिकृत लॉन्चिंगची तारीख जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 ऑक्टोबर रोजी गुगल पिक्सेल आपली नवीन सीरिज पिक्सेल 8 सीरिज भारतात लॉन्च करणार आहे. लॉन्चिंगआधीच गुगल पिक्सेल 8 सीरिज प्री ऑर्डरसह फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. सीरिज लॉन्च झाल्याच्या एका दिवसानंतर 5 ऑक्टोबरपासून फोन प्री ऑर्डर करता येणार आहे. (Google Pixel 8 Series)

    फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये उपलब्ध (Flipcart Big Billion Days Sale 2023)
    फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल 2023 ला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. फ्लिपकार्टने स्मार्टफोनच्या आकर्षक ऑफर्सबद्दल माहिती सांगितली आहे. फ्लिपकार्टने नुकतेच बहुप्रतीक्षित अशी गुगल पिक्सेल 8 सीरिज वेबसाइटवर दाखवण्यास सुरुवात केली आहे. पिक्सेल 8 सीरिजची प्री-ऑर्डर 5 ओक्टोबरपासून सुरू होईल, असं सांगण्यात आलं आहे. शक्तिशाली अशा नवीन पिक्सेल फोनमध्ये गुगल AI आणि आतापर्यंतचा अ‍ॅडव्हान्स कॅमेरा असणार आहे.

    गुगल पिक्सेल 8 आणि गुगल पिक्सेल 8 प्रो प्रेस रेन्डर्स
    याआधी WinFuture स्मार्टफोन्सचे प्रेस रेन्डर्स लीक झाले होते. प्रेस रेन्डर्सने आगामी लॉन्च होणारे दोन्ही फोन वेगवेगळ्या रंगात दाखवले आहेत. गुगल पिक्सेल 8 कदाचित चार वेगवगेळ्या तर गुगल पिक्सेल 8 प्रो तीन रंगांमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. दोन्ही फोन्समध्ये स्लिम बेझल आणि पंच होल नॉच डिझाइन देण्यात आले आहे.


    गुगल पिक्सेल 8 सीरिजची वैशिष्ट्ये
     गुगल पिक्सेल 8 सीरिजमध्ये काय असणार याविषयीची माहिती लीक झाली आहे. त्यानुसार 6.17 इंच फुल एचडी AMOLED डिस्प्ले मिळेल. ज्याचा रिफ्रेश रेट हा 120 Hz इतका असेल. दुसरीकडे गुगल पिक्सेल 8 प्रो मध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले मिळू शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा 120 Hz इतका असेल.

    कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. गुगल पिक्सेल 8 मध्ये अल्ट्रा वाइड अँगल शॉट्ससाठी सोनीच्या IMX386 सेंसरसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. पिक्सेल 8 प्रो मध्ये 64 मेगापिक्सेल आणि 48 मेगापिक्सेलच्या अल्ट्रा वाइड अँगल सह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

    गुगल पिक्सेल 8 आणि गुगल पिक्सेल 8 प्रो च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास गुगल पिक्सेल 8ची किंमत EUR 799 युरो (सुमारे 70,200 रुपये ) असेल. तर गुगल पिक्सेल 8 प्रो ची सुरुवातीची किंमत EUR 1,099 (सुमारे 96,500 रुपये ) असण्याची शक्यता आहे.