राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्‍या हस्‍ते हरियाणाच्या ओपन लूप तिकीटींग सिस्टिमचा शुभारंभ

एयू बँकेने (AU Bank) हरियाणा रोड ट्रान्‍सपोर्ट ओपन लूप ईटीआयएम (इलेक्‍ट्रॉनिक तिकिट इश्‍यूईंग मशिन) आणि कॅश, क्‍यूआर कोड/यूपीआयच्‍या माध्‍यमातून तिकिट पेमेंट व्‍यवहार करण्‍याची सेवा दिली आहे. या सेवेमधून प्रवाशांना सोईस्कर व सर्वोत्तम प्रवासाचा अनुभव मिळेल आणि तिकिट बुकिंगच्‍या डिजिटायझेशनमुळे रोख व्‍यवहार कमी होण्‍यास मदत होईल.

  • एयू स्मॉल फायनान्स बँक आणि ऑरियनप्रो सोल्यूशन्सद्वारे लागू

मुंबई : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President of India Draupadi Murmu) यांनी आज कुरुक्षेत्र (Kurukshetra) येथे गीता महोत्सव-२०२२ (Gita Mahotsav-2022) दरम्यान हरियाणा राज्य परिवहन महामंडळासाठी (For Haryana State Transport Corporation) कॅशलेस व कॉन्टॅक्टलेस (Cashless And Contactless) ‘ओपन लूप तिकीटींग सिस्टिम’चा (Open Loop Ticketing System) शुभारंभ केला.

यावेळी कार्यक्रमाला हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांच्यासह मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती होती, जसे, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर; नवदीप विर्क, प्रधान सचिव, राज्य परिवहन, हरियाणा; वीरेंद्र कुमार दहिया, संचालक, राज्य परिवहन, हरियाणा; अरविंद पुरोहित, नॅशनल मॅनेजर – गव्हर्नमेंट रिलेशनशिप ॲण्‍ड बिझनेस, एयू स्मॉल फायनान्स बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेचे वरिष्ठ प्रमुख.

डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत हरियाणाने आपल्या राज्य वाहतुकीच्या विद्यमान प्रवासी मॅन्युअल तिकीटींग सिस्टिमचे आधुनिकीकरण केले आहे. या कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस तिकीटींग प्रोग्रामच्‍या यंत्रणेमध्ये आगाऊ तिकिटे बुक करण्‍यासाठी एयू स्मॉल फायनान्स बँकेने जारी केलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी), इलेक्‍ट्रॉनिक तिकिट्स इश्‍यूईंग मशिन (ईटीआयएम), जीपीएस सिस्टिम आणि ऑनलाइन रिझर्व्‍हेशन सिस्टिमचा समावेश आहे.

एयू बँकेने (AU Bank) हरियाणा रोड ट्रान्‍सपोर्ट ओपन लूप ईटीआयएम (इलेक्‍ट्रॉनिक तिकिट इश्‍यूईंग मशिन) आणि कॅश, क्‍यूआर कोड/यूपीआयच्‍या माध्‍यमातून तिकिट पेमेंट व्‍यवहार करण्‍याची सेवा दिली आहे. या सेवेमधून प्रवाशांना सोईस्कर व सर्वोत्तम प्रवासाचा अनुभव मिळेल आणि तिकिट बुकिंगच्‍या डिजिटायझेशनमुळे रोख व्‍यवहार कमी होण्‍यास मदत होईल, तसेच महसूल संकलन प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल.

या उपक्रमाचा भाग म्‍हणून लोकांना विद्यार्थी, सशस्त्र दलातील कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक यांसारख्या प्रवाशांच्या सवलतीच्या/विनामूल्य श्रेणींसाठी बस पास म्‍हणून प्रीपेड ट्रान्झिट कार्ड्स सारख्‍या सेवा मिळण्‍यासोबत मोबाइल ॲप्‍लीकेशन व ऑनलाइन रिझर्व्‍हेशन सिस्टिम (ओआरएस) च्‍या माध्‍यमातून तिकिटे बुक करण्‍याची सेवा देखील मिळेल.

“नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सक्षम कॉन्टॅक्टलेस व पर्यावरण-अनुकूल इलेक्ट्रॉनिक तिकीटींग सिस्टिम सुरू केल्यामुळे हरियाणाने आता आपल्‍या संपूर्ण राज्य परिवहन ताफ्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आम्ही तिकीट बुकिंग आणि मोबाईल ॲप्लिकेशनसाठी सुधारित पॅसेंजर रिझर्व्‍हेशन सिस्टिम देखील सुरू केली आहे, जी https://ebooking.hrtransport.gov.in येथे उपलब्‍ध होऊ शकते. या नवीन सिस्टिम्‍समुळे आम्‍हाला कार्यरत कार्यक्षमता सुधारण्‍यामध्‍ये, कर्मचारीवर्गाचा कार्यक्षमपणे वापर करण्‍यामध्‍ये, एकूण प्रवास अनुभव वाढवण्‍यामध्‍ये आणि प्रवाशांचे राहणीमान सुलभ करण्‍यास मदत होईल आणि अशा प्रकारे तिकीट महसूलामध्‍ये वाढ होण्‍यासोबत बस व सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल,” असे नवदीप विर्क म्हणाले, प्रधान सचिव, हरियाणा रस्ते वाहतूक म्‍हणाले.

“एयू स्मॉल फायनान्स बँक भारतातील डिजिटलायझेशनला प्रबळ पाठिंबा देते. हरियाणा राज्य वाहतुकीच्‍या ओपन लूप तिकीटींग सिस्टिमकरिता बँकिंग भागीदार म्हणून आम्ही या कारणासाठी योगदान देऊ शकलो याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपल्या देशाच्‍या राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांच्‍या हस्‍ते या कार्यक्रमाचे उद्घाअन होणे हे आमच्‍या टीमसाठी अत्‍यंत सन्‍माननीय आहे. टीमने अत्‍यंत वैविध्‍यपूर्ण कार्ड रूपे एनसीएमसी विकसित केले आहे. हरियाणा रोडवेज बस नेटवर्कवर ऑफलाइन कार्ड बॅलन्ससह तिकीट खरेदी करण्याच्या उपयुक्ततेव्यतिरिक्त हे प्रीपेड ट्रान्झिट कार्ड इतर राज्य आणि शहर वाहतूक नेटवर्कवर तिकिट खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकते, जे ओपन लूप एनसीएमसी स्वीकृतीसाठी सक्षम आहे. एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी हरियाणा सरकार, हरियाणा राज्य मार्ग परिवहन विभाग आणि आमचे तंत्रज्ञान भागीदार ऑरियनप्रो सोल्‍यूशन्‍स लिमिटेड यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” असे एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे कार्यकारी संचालक उत्तम तिब्रेवाल म्‍हणाले.

ठळक वैशिष्ट्ये :

  • हरियाणाकडून ओपन लूप तिकिटींग सिस्टिमच्‍या माध्‍यमातून राज्य वाहतूक डिजिटायझेशन
  • हा उपक्रम भारत सरकारच्‍या ‘वन नेशन वन कार्ड’ दृष्टिकोनाशी संलग्‍न
  • या कॅशलेस तिकिटींग उपक्रमामध्‍ये आगाऊ तिकिटे बुक करण्‍यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी), इलेक्‍ट्रॉनिक तिकिट्स इश्‍यूईंग मशिन (ईटीआयएम), जीपीएस सिस्टिम आणि ऑनलाइन रिझर्व्‍हेशन सिस्टिमचा समावेश