
नागरिक ज्याप्रमाणे एसएमएसवरून व्हॉट्सॲपवर गेले; तसेच ॲनालॉग फोनवरूनही आयपी टेलिफोनकडे जावे लागेल. एकूणच हा त्या-त्या काळात बदलणाऱ्या तंत्रज्ञानातील महत्त्वाचा मुद्दा आहे. नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प हे यामध्ये उत्तम उदाहरण आहे.
रिषी वैद्य, संस्थापक, नेट पेट्रोल सोल्युशन्स
हॅकिंग (Hacking) हे फक्त लॅपटॉप आणि मोबाईलपुरते (Laptop And Mobile) मर्यादित नाही. ‘नेटफ्लिक्स’ (Netflix)च्या सिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे टेलिफोन कॉलर्स बँकिंग सिस्टम हॅक करण्यासाठी फोनलाईनचा वापर करतात(Telephone callers use phone lines to hack banking systems). याच पार्श्वभूमीवर सर्व सरकारी कार्यालयांमधील लँडलाईन सुविधा सुरक्षित करणे आवश्यक वाटते. टेलिफोन टॅपिंग आणि हॅकिंग आताच्या घडीला नवीन नाही; फोन टॅपिंग घोटाळ्यांनी १९७४ मधील ‘यूएस वॉटरगेट स्कँडल’पासून ते नुकत्याच झालेल्या रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणापर्यंत अनेकांना अडचणीत आणले आहे.
बदलत्या काळानुसार टेलिफोनमधील तंत्रज्ञान अद्ययावत झालेले नाही (Telephone technology Not Upgraded). टेलिफोन यंत्रणा ट्रंक कॉलने (Trunk Call) सुरू झाली. त्यामध्ये गुंतागुंतीच्या वायरिंगचा समावेश होता. ट्रंक ऑफिसद्वारे समोरील व्यक्तीला एखादा कॉल करण्याची प्रक्रिया ही अत्यंत क्लिष्ट होती. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कॉल जोडला जात होता. ट्रंक कॉलनंतर ॲनालॉग फोन आले. यातही मोठ्या प्रमाणात वायरिंगचा वापर होत होता; परंतु यात कॉलची गुणवत्ता पूर्वीपेक्षा चांगली होती. तंत्रज्ञानात अधिक प्रगती झाल्यानंतर डिजिटल फोन आले.
कॉल व्यवस्थापनाच्या (Call Mangement) बाबतीत डिजिटल फोनमध्ये (Digital Phone) सुधारणा झाली; परंतु कॉलच्या दर्जात अपेक्षित सुधारणा नव्हती. सुरळीत व्यवहार आणि संवादासाठी ॲनालॉग आणि डिजिटल फोन तितके सुसंवादी नव्हते. एकूणच संवादात समस्या उद्भवू लागल्याने नवीन तंत्रज्ञान विकसित झाले. त्यातून उद्योजकांच्या संवादातील अडथळे दूर होऊ लागले. त्यातील ‘आयपी टेलिफोन’ (IP Telephone) तंत्रज्ञानाने चांगली कॉल गुणवत्ता आणि सुलभ जोडणी प्रदान केली. हे आयपी फोन इंटरनेट प्रोटोकॉलवर (Internet Protocall) चालत होते. म्हणजेच कॉलशी संबंधित सर्व सुविधा इंटरनेटद्वारे उपलब्ध होत्या. व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (VoIP) फोन कॉलरच्या आवाजाचे इंटरनेटद्वारे प्राप्तकर्त्याकडे हस्तांतरण करण्यास परवानगी देते.
ही तंत्रज्ञानामधील नैसर्गिक प्रगती आहे. नागरिक ज्याप्रमाणे एसएमएसवरून व्हॉट्सॲपवर गेले; तसेच ॲनालॉग फोनवरूनही आयपी टेलिफोनकडे जावे लागेल. एकूणच हा त्या-त्या काळात बदलणाऱ्या तंत्रज्ञानातील महत्त्वाचा मुद्दा आहे. नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प हे यामध्ये उत्तम उदाहरण आहे. या प्रकल्पात आधुनिक पद्धतीच्या विटा आणि काँक्रिटचा वापर केला आहे. आयपी टेलिफोननेही संवादातील आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले आहे. गुजरात आणि तमिळनाडू या राज्यांनी संवादाचे हे क्लिष्ट तंत्र स्वीकारून ते आत्मसातही केले आहे. भारतातील इतर महत्त्वाची राज्ये या तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप मागे असल्याचे रिषी वैद्य, संस्थापक, नेट पेट्रोल सोल्युशन्स यांनी सांगितले.
आयपी टेलिफोन म्हणजे काय?
आयपी फोन इंटरनेटवर चालतात. म्हणजेच कॉलशी संबंधित सर्व गोष्टी इंटरनेट सुविधेद्वारे उपलब्ध होतात. आयपी फोन ॲनालॉग फोनपेक्षा का अधिक चांगले आहेत, हे आपण पाहणार आहोत.
किफायतशीर
आयपी टेलिफोन वापरण्याचा मोठा फायदा म्हणजे याचा वापर अत्यंत किफायतशीर आहे. ही प्रणाली इंटरनेटवर कार्य करत असल्याने, कॉलचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कॉल कमीत कमी दरात केले जाऊ शकतात, ज्यामुळे कॉल सेवांनंतर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
वायरलेस
सर्व इंटरनेट सेवा इथरनेट केबल्सवर पुरवल्या जातात; ज्या नंतर वायरलेस नेटवर्क प्रदान करण्यासाठी राउटरशी जोडल्या जातात. आयपी फोन इंटरनेट प्रोटोकॉलवर काम करत असल्याने, त्यांना ॲनालॉग फोन्सप्रमाणे अतिरिक्त केबलिंगची आवश्यकता नसते. शिवाय वायरलेस असल्याने, ते त्याच्या वापरकर्त्यांना अतिरिक्त फायदा देखील देते.
कॉलच्या दर्जात सुधारणा
इंटरनेटवरील डेटा हा डेटा पॅकच्या स्वरूपात पाठविला जातो. त्याचप्रमाणे, आयपी टेलिफोन हँडसेटमध्येही कॉलरचा आवाज व्हॉईस पॅकेटमध्ये रूपांतरित केला जातो आणि कॉल केलेल्या समोरील व्यक्तीकडे सर्व्हरद्वारे इंटरनेटवरून जोडला जातो. ही प्रक्रिया वापरकर्त्यांना स्पष्ट दर्जात्मक कॉल सेवा पुरवते आणि त्यातून सुलभ संवाद साधला जाऊ शकतो.
ॲप्लिकेशन इंटिग्रेशन
आयपी फोन इंटरनेटद्वारे चालतात, ज्यामध्ये काही ॲप्लिकेशन एकत्र केले जाऊ शकतात. सॉफ्ट फोन्स, निर्देशिका (डिरेक्टरी), तात्काळ संदेश वहन आदी उत्पादक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. या सर्व गोष्टी आयपी फोनला जोडलेले असतात, त्यातून वापरकर्त्यांना पुन्हा सुलभ सेवा प्रदान केली जाते.
अद्ययावतीकरण (अपग्रेडेबल)
आयपी प्लॅटफॉर्मवरद्वारे विद्यमान प्रणालीशी भविष्यातील तंत्रज्ञान अगदी सुलभरित्या जुळवून घेता येऊ शकते. त्यामुळेच विद्यमान टेलिफोन प्रणाली अद्ययावत करणे मोफत आणि वापरण्यास सुलभ होते.