
एचपीच्या स्मार्ट टँकच्या निर्मितीत ४५ टक्के घटक ग्राहकांनी वापरून फेकून दिलेल्या वस्तूंच्या पुनर्वापरातील आहेत. HP Planet Partners उपक्रमाच्या माध्यमातून कंपनीने मिळवलेल्या पुनर्वापरयोग्य शाईच्या प्लास्टिक बाटल्यांचाही समावेश आहे.
नवी दिल्ली : एचपी इंडियाने (HP India) आज स्मार्ट टँक प्रिंटर्सची (Smart Tank Printers) नवी श्रेणी (New Series) सादर केली. घरगुती वापर तसेच छोट्या तसेच लघु उद्योगातील दैनंदिन प्रिंटिंग गरजांसाठी या प्रिंटर्सची (Printers) खास रचना करण्यात आली आहे. सध्याच्या हायब्रिड जगात भारतातील घरे आणि छोटे उद्योग आपल्या डिजिटल बदलांसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत आणि त्यांना वाजवी दरातील, वापरण्यास सोपे आणि स्मार्ट प्रिंटिंग पर्याय हवे असतात.
उदयोन्मुख उद्योजक आणि व्यवसायांना पाठबळ देण्यासाठी एचपी स्मार्ट टँकमध्ये अधिक सहजसोपा सेटअप, स्मार्ट वैशिष्ट्ये आणि सेल्फ-हीलिंग वायफाय आणि स्मार्ट ॲप आणि स्मार्ट ॲडव्हान्समुळे अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळते आणि वापरकर्त्यांचा प्रिंटर वापरण्याचा अनुभव अधिक समृद्ध केला जातो. एचपीच्या नव्या इंक टँक प्रिंटर्समध्ये आधीपासूनच असलेल्या शाईमध्ये तुम्ही न थांबता १८,००० काळ्या शाईचे किंवा ६००० पर्यंत रंगीत प्रिंटिंग करू शकता.
“घरगुती वापर, छोट्या आणि लघु उद्योग व्यावसायिकांना वाजवी दरातील, विश्वासार्ह आणि वापरायलाही सोपे असेल असे स्मार्ट तंत्रज्ञान हवे असते आणि असेच ग्राहककेंद्री प्रिंटिंग पर्याय निर्माण करण्याची बांधिलकी एचपीने जपली आहे,” असे एचपी इंडिया मार्केटच्या प्रिंटिंग सिस्टम्स विभागाचे वरिष्ठ संचालक सुनिष राघवन म्हणाले. “स्मार्ट टँक प्रिंटर्सच्या आमच्या नव्या रेंजसह आमच्या ग्राहकांना अधिक उत्पादकता असलेले स्मार्ट, एकात्मिक, शाश्वत आणि विश्वासार्ह टँक प्रिंटिंग पर्याय पुरवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”
एचपीच्या स्मार्ट टँकच्या निर्मितीत ४५ टक्के घटक ग्राहकांनी वापरून फेकून दिलेल्या वस्तूंच्या पुनर्वापरातील आहेत. HP Planet Partners उपक्रमाच्या माध्यमातून कंपनीने मिळवलेल्या पुनर्वापरयोग्य शाईच्या प्लास्टिक बाटल्यांचाही समावेश आहे. शिवाय, हा उपक्रम ईपीईएटी सिल्व्हर आणि एनर्जी स्टार प्रमाणित आहे. एचपीच्या नव्या इंक टँक प्रिंटर्समध्ये लो इंक सेन्सर आहे. त्यामुळे शाई संपून नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे यातील मार्गदर्शनपर स्मार्ट बटणांमुळे मूल्याधारित, स्मार्ट, विश्वासार्ह प्रिटिंग शक्य होते.
सध्याच्या हायब्रिड जगात छोट्या उद्योगांसाठी सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा असतो. म्हणूनच, एचपीच्या वुल्फ सेक्युरिटीसह एचपी स्मार्ट टँक प्रिंटर्स ग्राहकांचे नेटवर्क आणि माहितीचे अनधिकृत ॲ क्सेसपासून संरक्षण करतात.
एचपी स्मार्ट टँक प्रिंटर श्रेणीचे महत्त्वाचे फायदे आणि वैशिष्ट्ये:
अधिक उत्पादकतेसाठी अधिक स्मार्ट
एचपीच्या स्मार्ट टँक प्रिंटर्सच्या नव्या श्रेणीमध्ये उच्च दर्जाचे आणि कमी दरातील प्रिंटिंश शक्य आहे त्यामुळे व्यवसायाची उत्पादकताही वाढते.
• या वर्गातील सर्वोत्कृष्ट एचपी स्मार्ट ॲ पमध्ये स्मार्ट-गाइडेड बटन्स आहेत, दैनंदिन प्रिंट, स्कॅन, कॉपी आणि फॅक्स अशा कामांमध्ये ही बटणे ग्राहकांना मार्गदर्शन करतात
• यात आयडीची ओळख आपोआपच पटवून आयडी कॉपी बटणसह ते प्रिंट केले जाते
• यात सेल्फ-हीलिंग वाय-फाय आहे आणि स्मार्ट ॲप आणि स्मार्ट ॲडव्हान्स या सुविधांमुळे कुठूनही प्रिंट करता येते, त्यामुळे वेगाने आणि अधिक विश्वासार्ह कनेक्शन्स मिळवता येतात.
• एचपी वुल्फ इसेंशिअल सिक्युरिटीमुळे महत्त्वाची माहिती सुरक्षित ठेवली जाते. हल्ली अनेक कुटुंबे घरातूनच काम करतात, शिक्षण घेतात त्यामुळे ही सुविधा महत्त्वाची ठरते.
स्मार्ट टँक व्हॅल्यू
अधिक प्रमाणातील प्रिंटिंगच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली स्मार्ट टँक श्रेणी रंगीत आणि कृष्णधवल प्रिंटिंग अगदी वाजवी दरात उपलब्ध करून देते. बॉक्समधील शाईच्या बाटलीसह १८००० काळ्या रंगातील तर ६,००० रंगीत पाने प्रिंट करता येतात.
• इंक सेन्सर्समुळे शाईचे व्यवस्थापन करणे आणि पातळी योग्य राखणे सोयीचे होते.
• या बॉक्समध्ये दोन वर्षांसाठीची शाई उपलब्ध आहे, अधिक प्रमाणातील प्रिटिंगसाठी याची खास रचना करण्यात आली आहे.
• समस्येवर उपाय म्हणून सहा तासांचा सर्विस कॉल आणि कॅच ॲ ण्ड डिस्पॅच सेवा अशा सुविधाही मिळतात.
शाश्वतता
ग्राहकांनी वापरून टाकून दिलेल्या घटकांचा निर्मितीत ४५ टक्के वापर करून बनवण्यात आलेल्या एचपी स्मार्ट टँक ५०० श्रेणीमध्ये स्मार्ट टँककडून ग्राहकांना अपेक्षित सर्व वैशिष्ट्ये आहेत. पुनर्वापरातील घटकांचे हे प्रमाण जगातील कोणत्याही टँक प्रिंटरहून अधिक आहे, हे विशेष! या श्रेणीमध्ये अनेक शाश्वतता वैशिष्ट्ये आहेत:
• ईपीईएटी सिल्व्हर आणि एनर्जी स्टार प्रमाणन.
• ऊर्जा बचत करणारे ऑटो ऑन/ऑफ तंत्रज्ञान- यात ग्राहकांना काहीच करावे लागत नाही.
• नो-वेस्ट टँक आणि सांडलवण होत नाही, पुनर्वापरयोग्य बाटल्या.
• यात सोयीस्कर इंक मॅनेजमेंटची सोय आहे, स्मार्ट टँक प्रिंटर्समधील इंक सेन्सरच्या साह्याने शाईची पातळी जोखली जाते आणि ती सुयोग्य राखलीही जाते.
साह्य
• ग्राहकांच्या अडचणींवर सहा तासांचा सर्विस कॉल तसेच कॅच ॲ ण्ड डिस्पॅच सेवा उपलब्ध आहेत.
किंमत आणि उपलब्धता
• एचपी स्मार्ट टँक ५८० ची किंमत १८८४८ रुपयांपासून सुरू होते.
• एचपी स्मार्ट टँक ५२० ची किंमत १५९८० रुपयांपासून सुरू होते.
• एचपी स्मार्ट टँक २१० ची किंमत १३३२६ रुपयांपासून सुरू होते.
एचपी स्मार्ट टँक प्रिंटर्सच्या श्रेणीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे भेट द्या https://store.hp.com/in-en/default/
नवी वैशिष्ट्ये
• एचपी स्मार्ट टँकच्या एकात्मिक स्मार्ट ॲ प मधील मार्गदर्शकपर स्मार्ट बटणांच्या साह्याने मिळतो वेगवान आणि सहजसोपा सेटअप
• कुठूनही प्रिंट करता यावे यासाठी एचपी स्मार्ट टँक ५८० सीरिजच्या सेल्फ-हीलिंग वाय-फाय सह अधिक कनेक्टिव्हिटी
• बाजारातील सर्वाधिक शाश्वत इंक टँक प्रिंटर ज्यातील ४५ टक्के भाग ग्राहकांनी वापरलेल्या वस्तूंच्या पुनर्वापरातून तयार करण्यात आला आहे