तुमचं वीज बील निम्म्याहून कमी व्हावं असं वाटतंय, मग फक्त घरातील या गोष्टींमध्ये करा बदल!

थंडीच्या मोसमात वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. वीज बिल वाढले म्हणजे आपले बजेट देखील बिघडते. या जास्त येणाऱ्या वीज बिलाच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी घरातील काही उपकरणं आपल्याला बदलावी लागतील, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

    महिन्यातील काही निश्चित खर्चांपैकी एक खर्च म्हणजे विजेचे बिल (Electricity Bill). वीज बिल हा नेहमीच मासिक खर्चाचा (Monthly Expences) मोठा भाग असतो. वीज बील नेहमीच कमी यावं म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतोच. काही वेळेस आपण अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही ज्यामुळे वीज बिल निम्म्याहून कमी होते. वीज बिल कमी येण्याचे सोपे उपाय येथे सांगणार आहोत.

    थंडीच्या मोसमात वीज बिलात (Electricity Bill) मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. वीज बिल वाढले म्हणजे आपले बजेट देखील बिघडते. या जास्त येणाऱ्या वीज बिलाच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी घरातील काही उपकरणं आपल्याला बदलावी लागतील, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

    तुम्ही अजूनही जुने बल्ब वापरत असाल तर ते वापरणं आधी बंद करा. हे बल्ब विजेचे बिल (Electricity Bill) झपाट्याने वाढवतात. त्यांच्यापासून सुटका होऊन, आपण वीज वापर कमी करू शकता. त्याऐवजी घरात एलईडी बल्ब वापरणे सुरू करा. एलईडी बल्ब विजेचा वापर कमी करून मोठ्या बिलांपासून आपल्याला वाचवू शकतो.

    थंडीच्या दिवसात हीटरचा (Heater) वापर सर्रास होतो. जर जास्त क्षमतेचा हीटर वापरत असाल तर ते लगेच काढून टाका. जास्त क्षमतेचे हीटर मोठ्या प्रमाणात वीज वापरतात आणि त्याचा थेट परिणाम बिलावर दिसून येतो. हीटरऐवजी ब्लोअर वापरणे किफायतशीर आहे. ब्लोअर सुरक्षित आहे तसेच ते कमी वीज वापरतो.

    आजही अनेक घरांमध्ये पाणी गरम करण्यासाठी रॉड्स किंवा जुन्या पद्धतीचे गिझर वापरले जातात. या दोन्हींमध्ये वीजेचा जास्त वापर होतो. विजेचा जास्त वापर केल्यास बिलात वाढ होते. म्हणूनच आजच रॉड आणि जुन्या पद्धतीच्या गिझरऐवजी अत्याधुनिक गिझर घरात आणा. नवीन गिझरला ५ स्टार रेटिंग आहे का ते पाहून घ्या. ५ स्टार रेटिंग असलेले गिझर कमी वीज वापरतात ज्यामुळे आपले वीज बील कमी करता येईल.