
या सर्वेक्षणातील ३० टक्के सहभागींनी ते सहजपणे बँक लॉकर वापरताना सर्वात जास्त जागरूक असतात, म्हणजे त्यांना कोणालाही मदतीला बोलवावे लागत नाही. गेल्या वर्षी गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सनी नव्या युगाचे लॉकर लाँच करत बँकिंग सुरक्षा बाजारपेठेत नवी समीकरणे प्रस्थापित केली होती.
- गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे सर्वेक्षण
- खास प्रसंगी आपल्या मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यास पसंती
- घरात स्मार्ट सिक्युरिटी सुविधा वापरण्याविषयी अनुत्सुकता
मुंबई : सण, लग्न समारंभ आणि इतर कार्यप्रसंगी दरम्यान भारतीय नागरिक घरात असलेल्या मौल्यवान वस्तूंवर कसे लक्ष ठेवतात? अशा वस्तू घरीच सुरक्षित ठेवण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुरक्षा उपायांविषयी ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असली, तरी मौल्यवान चीजवस्तू (valuable commodity) ठेवण्यासाठी सर्वाधिक पसंती आजही घरातील पारंपरिक कपाट किंवा बँकेच्या लॉकरला आहे (The most preferred one is still the traditional closet at home or bank locker).
गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसचा विभाग गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने (Godrej Security Solutions) घरातील सुरक्षेविषयी जागरूकता व अमलबजावणीतील वाढत्या उणीवांविषयी ‘डिकोडिंग सेफ अँड साउंड – इन द इंडियन कॉन्टेक्स्ट’ (Decoding Safe and Sound – In the Indian Context) नावाचे सर्वेक्षण (Survey) केले आहे. या सर्वेक्षणानुसार भारतीयांसाठी सुरक्षा तीन महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असते – आरोग्य- स्वास्थ्य, मालमत्तेची सुरक्षा आणि तंत्रज्ञानविषयक सुरक्षा. सहभागींपैकी ३८ टक्के जण सण, लग्न किंवा इतर कार्यक्रमांवेळी त्यांच्या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये (Bank Lockers) ठेवणे पसंत करतात.
३८ टक्के सहभागींनी बँक लॉकर हाताळताना मौल्यवान वस्तू किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षेविषयी सर्वाधिक जागरूक असल्याचे मत व्यक्त करत मालमत्तेच्या सुरक्षेवर असलेला भर परत अधोरेखित केला. भारतीय नागरिक त्यांच्या आवडत्या सणाच्या आगमनासाठी सज्ज होत आहेत तसेच आगामी लग्नसराई- विविध कार्यक्रमांची तयारी करत असून कोविड महामारीनंतर दोन वर्षांनी या सगळ्याचा पूर्ण आनंद घेण्यासाठी आपल्या मौल्यवान वस्तू घरातल्या पारंपरिक कपाटात ठेवणार असल्याचे सांगितले. या निष्कर्षांनुसार लोकांना आपल्या चीजवस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बँक किंवा कपाटांचा आधार घ्यावासा वाटतो, कारण घरी स्मार्ट सुरक्षित सुविधांचा अभाव आहे. या निष्कर्षांतून आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो आणि तो म्हणजे लोक स्मार्ट सिक्युरिटी सोल्यूशन्सचा अवलंब करण्यासाठी इतके अनुत्सुक का आहेत?
गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सचे व्यवसाय प्रमुख पुष्कर गोखले म्हणाले, ‘ देशातील गुन्हेगारीचा दर वाढत असून घरगुती तिजोरी, वैयक्तिक लॉकर्स, घरासाठी कॅमेरे, व्हिडिओ डोअर फोन्ससारख्या सुरक्षा सुविधांचा वापर अजूनही बाल्यावस्थेत आहे. मात्र, महामारीनंतर लोक परत मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडायला लागल्यामुळे घरच्या सुरक्षेची गरज वाढली आहे. त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारांचा सराईतपणा वाढल्यामुळे बँका, आर्थिक संस्था आणि नागरिकांना बँक लॉकर हाताळतानाही मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची चिंता वाटते. सर्वेक्षणातून असे समोर आले आहे, की तंत्रज्ञानावर आधारित सुविधा असतानाही त्यांच्याविषयी जागरूकता आणि अवलंब यात मोठी दरी आहे. या सर्वेक्षणातून सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करणे, उपलब्ध पर्यायांविषयी नागरिकांना जागरूक करणे आणि कशाप्रकारे सुरक्षा यंत्रणा जास्त सुरक्षित व सोयीस्कर असल्याचे दाखवून देणे इत्यादी हेतू आहेत. ’
या सर्वेक्षणातील ३० टक्के सहभागींनी ते सहजपणे बँक लॉकर वापरताना सर्वात जास्त जागरूक असतात, म्हणजे त्यांना कोणालाही मदतीला बोलवावे लागत नाही. गेल्या वर्षी गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सनी नव्या युगाचे लॉकर लाँच करत बँकिंग सुरक्षा बाजारपेठेत नवी समीकरणे प्रस्थापित केली होती. विशेषतः ऑगस्ट २०२१ मध्ये आरबीआयने सेफ बँकिंग संस्थांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या हेतूने डिपॉझिट लॉकर्ससाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर हे लाँच अतिशय महत्त्वाचे ठरले होते. मानवी हस्तक्षेपाची गरज काढून टाकणारे हे उच्च तंत्रज्ञानयुक्त सेफ डिपॉझिट लॉकर्स ग्राहकांना किल्लीशिवाय वापरण्याचा सोयीस्करपणा मिळतो तसेच फसवणूक किंवा गैरव्यवहारांची शक्यताही टाळली जाते.
गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने भारतातील सात शहरांत हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार फिजिटल सुविधांची मोठी गरज तयार झाली आहे. गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्स ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक डिजिटल तंत्रज्ञान उभारण्यासाठी यापुढेही १२-१५ टक्के गुंतवणूक करत राहील. कंपनी देशातील सुरक्षाविषयक उणीवा भरून काढण्यासाठी सातत्याने निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक इमारतींसाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा सुविधा तयार करते.