आता शरमेने लाजयचं कारणच नाही; मध्य रेल्वेने सीएसएमटी येथील वेस्टर्न स्टाइल टॉयलेटमध्ये आणले स्वयंचलित सीट कव्हर

यांत्रिकरित्या (नॉन इलेक्ट्रिक) कार्य करणारी स्वयंचलित सीट कव्हर लिफ्ट अप व्यवस्था करण्यात आली आहे. यातील स्प्रिंग ॲक्शन नेहमी त्याचे सीट कव्हर 'लिफ्ट अप पोझिशन'मध्ये ठेवते. जेव्हा त्याचा वापर केवळ शौचालयाच्या उद्देशासाठी करावा लागतो तेव्हा ते सहजपणे खाली ढकलता येऊ शकते.

  • मध्य रेल्वेचे स्वच्छ भारत अभियानात अनोखे योगदान

मुंबई : सार्वजनिक शौचालयांमध्ये (Public Toilets) जेथे वेस्टर्न कमोडच्या (Western Commode) जागा आहेत, बहुतेक लोक लघवी करण्यापूर्वी सीट कव्हर (Seat Cover) उचलत नाहीत, ज्यामुळे इतर लोकांना ते वापरणे अस्वच्छ वाटते. या समस्येवर मात करण्यासाठी ‘स्वयंचलित सीट कव्हर अप’ (Automatic Seat Cover Up) ही नवीन संकल्पना तयार करण्यात मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल (Rajnish Kumar Goyal, Divisional Railway Manager, Mumbai Division ) महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

यांत्रिकरित्या (नॉन इलेक्ट्रिक) कार्य करणारी स्वयंचलित सीट कव्हर लिफ्ट अप व्यवस्था करण्यात आली आहे. यातील स्प्रिंग ॲक्शन नेहमी त्याचे सीट कव्हर ‘लिफ्ट अप पोझिशन’मध्ये ठेवते. जेव्हा त्याचा वापर केवळ शौचालयाच्या उद्देशासाठी करावा लागतो तेव्हा ते सहजपणे खाली ढकलता येऊ शकते. जोपर्यंत एखादी व्यक्ती त्याचा वापर करत असेल तोपर्यंत ते खाली (Down) स्थितीत राहील, अन्यथा ते आपोआप वरच्या आणि सामान्य स्थितीत परत येईल. ऑटो लिफ्ट अपसाठी स्प्रिंग्सची जोडी, माउंटसाठी ॲल्युमिनियम बेस प्लेट आणि बोल्टची जोडी वापरून व्यवस्था केली जाते.

पाहा व्हिडिओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by NavaRashtra (@navarashtra)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील उपनगरी आणि मेन लाइनवरील सार्वजनिक शौचालयांमध्ये ‘स्वयंचलित सीट कव्हर अप’ उपलब्ध करण्यात आले आहेत. आपले अनुभव शेअर करण्यासाठी प्रवाशांचे स्वागत आहे. हे स्वयंचलित सीट कव्हर अप हळूहळू मुंबई विभागातील इतर रेल्वे स्थानकांवरील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये बसवण्यात येतील.