
पृथ्वीच्या शेजारी असलेल्या मंगळावर सध्या अनेक अंतराळयान आणि रोव्हर पोहोचलेले आहेत. या लाल ग्रहावर सध्या ‘इंजिन्युटी’ हे हेलिकॉप्टरही उडत आहे. एकंदरीतच मंगळ आणि त्याचा इतिहास शोधण्यासाठीचे प्रयत्न वेगाने होत आहेत. अशावेळी एका वरिष्ठ अमेरिकन संशोधकाने दावा केला आहे की त्याने मंगळावर जीवसृष्टीचा पुरावा शोधलेला आहे. या ग्रहावर किड्यासारखी आकृती असलेला जीव शोधल्याचाही दावा त्यांनी केला आहे(Insect-shaped creatures on Mars).
वॉशिंग्टन : पृथ्वीच्या शेजारी असलेल्या मंगळावर सध्या अनेक अंतराळयान आणि रोव्हर पोहोचलेले आहेत. या लाल ग्रहावर सध्या ‘इंजिन्युटी’ हे हेलिकॉप्टरही उडत आहे. एकंदरीतच मंगळ आणि त्याचा इतिहास शोधण्यासाठीचे प्रयत्न वेगाने होत आहेत. अशावेळी एका वरिष्ठ अमेरिकन संशोधकाने दावा केला आहे की त्याने मंगळावर जीवसृष्टीचा पुरावा शोधलेला आहे. या ग्रहावर किड्यासारखी आकृती असलेला जीव शोधल्याचाही दावा त्यांनी केला आहे(Insect-shaped creatures on Mars).
अर्थातच त्यांच्या सहकारी संशोधकांना हे मान्य नाही. नासाचे 97 वर्षे वयाचे संशोधक गिल्बर्ट व्ही. लेविन यांनी सांगितले की त्यांनी 45 वर्षांपूर्वी नासाच्या ‘वायकिंग मार्स प्रोब मिशन’मध्ये सुपरवायझर म्हणून काम केले होते.
या मिशनचे नाव होते ‘लेबल्ड रीलिज एक्सपिरिमेंट’. या मोहिमेत मंगळावरील मातीत सूक्ष्म जीवांद्वारे उत्सर्जित केलेल्या वायूंचा छडा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.