Snapchat ची क्रेझ संपणार? नवा अॅप लाँच करत Instagram ने दिलं सरप्राईज, यूजर्सना मिळणार ही खास सुविधा
असा दावा केला जात आहे की, इंस्टाग्राम स्नॅपचॅटच्या लोकप्रिय फीचर्सची नक्कल करत आहे. मात्र यामध्ये काही बदल केले जात आहेत, हेदेखील तितकेच खरे आहे. आता इंस्टाग्रामने पुन्हा एकदा त्यांच्या यूजर्सना चकित केले आहे. कंपनीने Instants नावाचे एक नवीन इमेज-शेयरिंग अॅप रोलआऊट केले आहे. यामध्ये यूजर्सना डिसअपीयरिंग फोटोज इतर यूजर्ससोबत शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे. हे फोटो केवळ एकदाच पाहू शकता आणि 24 तासांपर्यंत उपलब्ध असणार आहेत. तुम्हाला देखील हे सर्व कुठेतरी ऐकल्या सारखं वाटतं आहे का? हे अॅप काही प्रमाणात स्नॅपचॅटसारखेच आहे. जिथे यूजर्स स्नॅप पाठवतात आणि स्ट्रिक तयार करतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने गुगल प्ले स्टोअरवर त्यांचे नवीन इमेज-शेयरिंग अॅप लिस्ट केले आहे. मात्र यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, ही इमेज-शेयरिंग अॅप भारतीय यूजर्ससाठी उपलब्ध नाही. रियल-टाइम शेयरिंग अधिक सोपी आणि सुरक्षित व्हावी यासाठी नवं अॅप लाँच करण्यात आलं आहे. हे अॅप शॉट्स फीचरवर आधारित आहे. पण हे अॅप विशेषतः अशा कंटेंटसाठी डिझाइन केले आहे जे पटकन शेअर केले जाते आणि आपोआप गायब होते.
स्नॅपचॅटच्या तुलनेत 24 तासांची टाइमलाइन फार मोठे अंतर आहे. कारण स्नॅपचॅट अशा प्रकारचे स्ट्रिक्ट व्यूइंग लिमिट फॉलो करत नाही. वस्तू जास्त खऱ्या आणि अनफिल्टर्ड राहाव्या यासाठी नवीन इमेज-शेयरिंग अॅप यूजर्सना केवळ सिंगल टॅपमध्ये फोटो कॅप्चर करू देते, ज्यामध्ये एडिटिंग ऑप्शन मिळत नाही. यूजर्स कॅमेरा रोलमधून ईमेज अपलोड करू शकत नाहीत. याचा अर्थ असा आहे की, सर्व कंटेट अॅपच्या कॅमेऱ्यामधूनच कॅप्चर करावे लागणार आहेत आणि शेअर करावे लागणार आहेत.
लक्षात ठेवा की तुम्ही नवीन इमेज-शेयरिंग अॅपमध्ये फोटो शेअर करताना टेक्स्ट जोडू शकता. मात्र हे अनएडिटेड फोटोज पुढे कोणीही मॉडिफाय करू शकत नाही. इंस्टाग्रामने काही निवडक यूजर्सना हे फीचर चाचणीसाठी उपलब्ध करून दिले आहे. हे नवं अॅप सध्या स्पेन आणि इटलीमध्ये उपलब्ध आहे. अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाईसवर नवं प्लॅटफॉर्म अॅक्सेस केले जाऊ शकते.






