Instagram Reels आता करता येणार डाऊनलोड, कंपनीने आणलंय नवं फिचर, कसा करता येईल वापर ?

बरेच लोक रील डाऊनलोड करण्यासाठी इतर ॲप्सचा वापर करतात. मात्र आता तुमचा तो त्रास वाचणार आहे. कारण कंपनीने थेट रील डाऊनलोड करण्याचा पर्याय आणला आहे.

  इन्स्टाग्रामवर रील्स तयार करणं आणि इन्स्टाग्रामवर रील्स बघणं हा आजकालच्या तरुणाईचा मोठा छंदच आहे.(Instagram Reels) इन्स्टाग्राम (Instagram) हे सध्या सगळ्यात जास्त वापरलं जाणारं ॲप आहे. या ॲपच्या मदतीने अनेक लोक हजारो-लाखो रुपये कमवतात. इन्स्टाग्राम सतत नवीनवीन फीचर्स (Features) आणत असतं. आता असंच एक नवीन फीचर इन्स्टाग्रामने आणले आहे. इन्स्टाग्रामवर कोणतंही रील (Reel) तुम्हाला एका क्लिकवर डाऊनलोड करता येणार आहे. रील डाऊनलोड (Download) करण्याची पद्धत जाणून घेऊयात. (Instagram Update)

  बरेच लोक रील डाऊनलोड करण्यासाठी इतर ॲप्सचा वापर करतात. मात्र आता तुमचा तो त्रास वाचणार आहे. कारण कंपनीने थेट रील डाऊनलोड करण्याचा पर्याय आणला आहे. हे नवीन फीचर टिकटाॅक (Tiktok) सारखंच काम करणार आहे. टिकटाॅकवरील व्हिडिओ डाऊनलोड करताना त्यावर वाॅटरमार्क येत होता. पण हे रील्स डाऊनलोड केल्यावर कोणताही वाॅटरमार्क येणार नाही.

  सुरुवातीला अमेरिकेत सुविधा सुरु
  सध्यातरी रील्स डाऊनलोड करण्याचा पर्याय केवळ US मधील युजर्ससाठी उपलब्ध आहे. हळूहळू कंपनी हे फीचर इतर देशांसाठीही उपलब्ध करुन देणार आहे.

  कसं डाऊनलोड कराल रील?
  -रील्स डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला शेअर रील या बटणावर क्लिक करावं लागेल.
  – तिथे तुम्हाला डाऊनलोड पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास रील तुमच्या फोनच्या गॅलरीत सेव्ह होईल.

  फक्त पब्लिक अकाऊंटवरचे रील्स करता येणार डाऊनलोड
  एखाद्याचे अकाऊंट पब्लिक असल्यास तो युझर हवं तेव्हा रील डाऊनलोड करण्याचा पर्याय काढून टाकू शकतो. त्यामुळे अशा वेळी त्याला रील डाऊनलोड करता येणार नाही. Instagram ने अलिकडे जगभरातील युझर्ससाठी नोट्समध्ये म्युझिक क्लिप जोडण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. यासोबतच यूजर नोट्सचे भाषांतरही करु शकतात. Instagram Notes मध्ये, युजर्स जास्तीत जास्त 30 सेकंदांपर्यंत ऑडिओ क्लिप शेअर करु शकतात. कंपनीने नोट्स फीचर गेल्या वर्षी सुरु केलं होतं. या अंतर्गत, युजर्स दिवसाचे अपडेट किंवा त्यांचे विचार 60 अक्षरांमध्ये इतरांपर्यंत पोहोचवू शकतात.