इलॉन मस्क सुद्धा iPhone 15 चे दिवाने, ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत दिली माहिती

इलॉन मस्क यांनी 'एक्स'वर पोस्ट करुन iPhone 15 खरेदी केला आहे आणि iPhone 15 खरेदी करण्याचं कारण सुद्धा सांगितलं आहे.

    iPhone 15 – इलॉन मस्क : Apple च्या iPhone ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नुकताच बाजारामध्ये iPhone 15 आला आहे आणि तो खरेदी करण्यासाठी भारतामधील त्याचबरोबर जगामधील लोकांची झुंबड उडाली आहे. मुंबईच्या बीकेसीमध्ये लोकांनी iPhone 15 खरेदीसाठी कित्येक तास रांगा लावल्या होत्या. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आयफोनमध्ये एवढं खास काय आहे. परंतु ज्यांनी हा मोबाईल हाताळला आहे त्यांनाच या मोबाईलची किंमत माहिती आहे. एवढेच नव्हे तर अब्जाधीश इलॉन मस्क यांनीही याला दुजोरा दिला आहे.

    इलॉन मस्क यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन iPhone 15 खरेदी केला आहे आणि iPhone 15 खरेदी करण्याचं कारण सुद्धा सांगितलं आहे. त्याचबरोबर त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये जे कारण सांगितले आहे त्यावर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. इलॉन मस्क म्हणाले की, iPhone 15 च्या फोटो आणि व्हिडिओची क्वालिटी अद्भूत आहे. त्यामुळे मी तो खरेदी करणार आहे. Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी एक्सवर काही फोटो शेअर केले आहेत. याच्या संदर्भात मस्क यांनी ही पोस्ट केलीये. कूक यांनी शेअर केलेले फोटो स्टिफन विल्केस (Stephen Wilkes) आणि रियुबेन वू (Reuben Wu) या फोटोग्राफरनी हे फोटो काढलेले आहेत.

    स्टिफन विल्केस आणि रियुबेन वू हे नावाजलेले फोटोग्राफर आहेत. त्यांनी iPhone 15 च्या माध्यमातून घेतलेल्या फोटोंत अप्रतिम असे दृश्य कैद कैले आहेत, असं कूक म्हणाले. टीम कूक यांची पोस्ट रिपोस्ट करुन इलॉन मस्क यांनी iPhone 15 च्या खास वैशिष्ट्यांचे कौतुक केले आहे. iPhone मधून घेतलेले फोटो आणि व्हिडिओ नक्कीच चांगले असतात, त्यामुळे iPhone 15 खरेदी करेन, असं ते म्हणालेत.