सुपरफास्‍टपे (SuperFastPay) सुविधा सुरू करत मीशोने गाठली विक्रेत्यांच्या सक्षमीकरणाची पुढची पायरी

छोटे व्यवसाय टिकायचे तर त्यासाठी रोख रकमेची परिणामकारक आवक सतत होत राहिली पाहिजे. मीशो सुपरफास्‍टपेमुळे एमएसएमईंना आपल्या खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन, विशेषत: सर्वाधिक विक्रीच्या मोसमांदरम्यान अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. यामुळे त्यांना आपल्या मालाच्या सूचीमध्ये नवा माल अधिक वेगाने भरता येईल, आपल्या पुरवठादारांकडून आकर्षक रोख सवलती मिळवता येतील

  • पात्र विक्रेते SuperFastPay सुविधा वापरून पेमेंट्स मिळविण्याची प्रक्रिया २४ तासांत पूर्ण करण्यासाठी करू शकतात

मुंबई : भारताची एकमेव खराखुरी ई-कॉमर्स बाजारपेठ (E Commerce Market) असलेल्या मीशोने (Meesho) खास आपल्या विक्रेत्यांना त्यांचे पेमेंट्स (Payments) आणखी जलद गतीने मिळवून देत त्यांना पाठबळ देण्यासाठी तयार केलेली मीशो सुपरफास्‍टपे (Meesho SuperFastPay ) ही सेवा सुरू केली आहे. बिगर बँकिंग वित्तीय कंपनी प्रोटियमच्या भागीदारीने सुसज्ज करण्यात आलेली ही नवी सेवा मोठा बदल घडवून आणणारी ठरणार आहे, कारण या सेवेमुळे विक्रेत्यांची ऑर्डर पिकअप झाल्यानंतर (Order Pick Up) एका दिवसामध्येच त्यांचे पेमेंट मिळणार आहे (Payment With In Same Day). पात्र विक्रेत्यांना आता आपल्या कष्टांचा लाभ घेता येणार आहे आणि मीशो सुपरफास्‍टपेच्या साथीने कधी नव्हे इतक्या वेगाने आपल्या कामाचा मोबदला प्राप्त करता येणार आहे.

छोटे व्यवसाय टिकायचे तर त्यासाठी रोख रकमेची परिणामकारक आवक सतत होत राहिली पाहिजे. मीशो सुपरफास्‍टपेमुळे एमएसएमईंना आपल्या खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन, विशेषत: सर्वाधिक विक्रीच्या मोसमांदरम्यान अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. यामुळे त्यांना आपल्या मालाच्या सूचीमध्ये नवा माल अधिक वेगाने भरता येईल, आपल्या पुरवठादारांकडून आकर्षक रोख सवलती मिळवता येतील, व्हेंडर्सना वेळच्यावेळी पैसे देता येतील आणि जराही उशीर न करता नवीन कॅटलॉग्ज दाखल करता येतील.

मीशोवर नावनोंदणी केलेल्या सर्व पात्र विक्रेत्यांना अगदी नाममात्र शुल्क भरून उपलब्ध होणारी सुपरफास्‍टपे सुविधा त्यांना आपली पत विकसित करण्यासाठी संधी मिळवून देईल आणि मीशोद्वारे लवकरच दाखल केल्या जाणाऱ्या इतर कर्ज उत्पादनांचा लाभ घेण्यासाठी पात्र होता येईल. विक्रेत्यांना सेलर पॅनेलवरील ‘पेमेंट्स’ टॅबखाली मीशो सुपरफास्‍टपेसाठी आपली पात्रता तपासता येईल.

मीशोच्या मॉनिटायझेशन विभागाचे सीएक्सओ हर्ष चौधरी म्हणाले, “आमचा विक्रेतावर्ग हा आमच्या प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी असतो. आमच्या विक्रेत्यांना औपचारिक संस्थांकडून पतपुरवठा मिळविताना येणाऱ्या अडचणी आम्हाला समजतात आणि त्यांना त्यांचा व्यवसाय भरभराटीस आणण्यासाठी आवश्यक ती सर्व संसाधने पुरवून त्यांना सक्षम करण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत. मीशो सुपरफास्‍टपे ही केवळ एक सुविधा नव्हे तर मालाची यादी तयार करणे, आपली उत्पादनश्रेणी विस्तारणे आणि रोख सवलतींसह कच्चा माल प्राप्त करणे अशा अनेक कामांमध्ये पुनर्गुंतवणूक करण्यासाठीची ती एक उपाययोजना आहे. सुपरफास्‍टपे सुरू करत आम्ही आमच्या विक्रेत्यांना झटपट पेमेंट्स मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून त्यांना विकासाच्या मार्गावरून अधिक वेगाने प्रवास करता यावा.”

पेहेरावाच्या कपड्यांची किरकोळ विक्री करणारे सुरत येथील जयेश वाघासिया पुढे महणाले, “मीशो सुपरफास्‍टपे ही सुविधा अतिशय छान आहे, या सुविधेचा वापर करून मी माझ्या व्यवसायाची वृद्धी करू शकतो! आता मला माझी पेमेंट्स लगेच मिळत आहेत आणि उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे. माझा पेहेरावाचे कपडे बनविण्याचा व्यवसाय आहे आणि आम्हाला आता कच्चा माल खूपच लवकर ऑर्डर करता येतो व त्यावर सवलतही मिळवता येते.”

पोर्टियम इंडियाचे भागीदार पद्मनाभ बालसुब्रमण्यन म्हणाले, “मीशोकडे असलेला छोट्या उद्योगांच्या डिजिटायझेशनचा सखोल अनुभव हा एमएसएमईंसाठी रोख रकमेच्या सततच्या उपलब्धतेविषयीच्या समस्यावर उपाय शोधून देणारी आगळीवेगळी वित्तीय उपाययोजना तयार करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरला. विक्रेत्यांना कधी नव्हे इतक्या वेगाने पेमेंट मिळवण्यास मदत करणाऱ्या मीशो सुपरफास्‍टपे सारख्या लवचिक, स्वस्त आणि डिजिटल-फर्स्ट उपक्रमाची निर्मिती करण्यासाठी मीशो बरोबर भागीदारीची संधी मिळाल्याबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत.”

मीशोच्या 11 लाख विक्रेत्यांपैकी जवळ-जवळ 50 टक्‍के विक्रेते हे Tier 2+ श्रेणीच्या प्रदेशांतील आणि काश्मीरमधील पुलवामा, हिमाचल प्रदेशातील उना, कर्नाटकातील नागमंडला, मेघालयातील जोवाइ आणि राजस्थानातील माऊंट अबू यांसारख्या देशाच्या अंतर्गत भागांतील आहेत. कंपनीने उचललेल्या विक्रेता-स्नेही पावलांमुळे गेल्या वर्षभरात ६ लाख विक्रेते मीशोबरोबर जोडले गेले आहेत.

विक्रेत्यांमध्ये कोणतीही श्रेणी न पाडणारा, वा फरक न करणारा मीशो हा मंच छोट्या उद्योगांना समान संधीचे क्षेत्र पुरविण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. सुपरफास्‍टपे सुविधेचा शुभारंभ म्हणजे छोट्या उद्योगांना सतत पाठबळ देत राहण्याच्या मीशोच्या वचनबद्धतेचे आणखी एक उदाहरण आहे.