Apple launches cheapest and most awaited iPhone SE 3; Cheap in America but expensive in India!

Apple ने आपला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G सपोर्ट असलेला iPhone SE 3 लाँच केला आहे. मात्र, अमेरिकेत स्वस्त असला तरी भारतात मात्र हा फोन महाग मिळणार आहे. भारतीय बाजारपेठेत हा फोन तब्बल 11000 रुपयांनी महाग आहे(Cheap in America but expensive in India!).

    Apple ने आपला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G सपोर्ट असलेला iPhone SE 3 लाँच केला आहे. मात्र, अमेरिकेत स्वस्त असला तरी भारतात मात्र हा फोन महाग मिळणार आहे. भारतीय बाजारपेठेत हा फोन तब्बल 11000 रुपयांनी महाग आहे(Cheap in America but expensive in India!).

    iPhone SE 3 मध्ये A15 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन iPhone SE 2020 चे अपडेट व्हर्जन आहे. प्रोसेसरसोबतच या फोन मध्ये तगडा बॅटरी बॅकअप असल्याचा कंपनीचा दावा आहे.  Apple iPhone SE 5G कंपनीने जुन्या डिझाइनसह लॉन्च केला आहे, जो iPhone SE 2020 सारखाच दिसतो.

    Apple iPhone SE चे बेस्ट फिचर्स

    •  4.7-इंचाची रेटिना एचडी स्क्रीन
    • पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना प्रोटेक्टिव्ह ग्लास
    • 5G कनेक्टीव्हीटी
    • A15 Bionic चिपसेट
    • 6-कोर CPU, 4-कोर GPU आणि 16-कोर न्यूरल इंजिन
    • LIVE TEXT ऑप्शन
    • 12MP सिंगल रियर कॅमेरा
    • HDR 4, फोटोग्राफिक स्टाइल्स, डीप फ्यूजन आणि पोर्ट्रेट मोड
    • iOS 15 अपडेट
    • मिडनाईट, स्टारलाइट आणि प्रॉडक्ट रेड असे तीन कलर ऑप्शन
    • फास्ट चार्जिंग सपोर्ट परंतु चार्जर बॉक्समध्ये उपलब्ध होणार नाही
    • 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध

    iPhone SE 3 ची किंमत

    अमेरिकेत या फोनची किंमत 429 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयानुसार 33000 हजार पासून स्टार्ट होत आहे आहे. तर भारतात iPhone SE ची सुरुवातीची किंमत 43,900 रुपये आहे. भारतात iPhone SE च्या 64GB बेस मॉडेलसाठी 43900 रुपये द्यावे लागतील. तर फोनच्या 128GB साठी 48,900 आणि 256GB साठी 58,900 रुपये द्यावे लागतील. ही प्राईज iPhone SE 2020 च्या लॉन्च किंमतीपेक्षा जास्त आहे. iPhone SE 2020 च्या बेस व्हेरिएंटची लॉन्च किंमत 42,500 रुपये होती. 11 मार्चपासून iPhone SE 3 खरेदी केले जाऊ शकते आणि 18 मार्चपासून त्याची शिपिंग सुरू होईल.