पहिल्यांदाच 10 हजारांपेक्षाही कमी किमतीत मिळतोय 5G स्मार्टफोन, 50MP Camera आणि 5000mAh ची दमदार बॅटरीही मिळणार

गेल्या वर्षी भारतात 5G सेवा लाँच (5G Service Launch) झाल्यानंतर ही सेवा आपल्या ग्राहकांना मिळावी, यासाठी सर्वच कंपन्यांचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी, एकीकडे दूरसंचार कंपन्या त्यांच्या 5G सेवा आणत आहेत. तर दुसरीकडे मोबाईल निर्मात्या कंपन्याही वेगाने 5G स्मार्टफोन बाजारात आणत आहेत.

  नवी दिल्ली : गेल्या वर्षी भारतात 5G सेवा लाँच (5G Service Launch) झाल्यानंतर ही सेवा आपल्या ग्राहकांना मिळावी, यासाठी सर्वच कंपन्यांचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी, एकीकडे दूरसंचार कंपन्या त्यांच्या 5G सेवा आणत आहेत. तर दुसरीकडे मोबाईल निर्मात्या कंपन्याही वेगाने 5G स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. त्यात आता नवा स्मार्टफोन अगदी स्वस्तात मिळणार आहे. Infinix Hot 20 हा 5G स्मार्टफोन 10 हजारांपेक्षाही कमी किमतीत मिळणार आहे.

  स्मार्टफोनमध्ये यापूर्वी फक्त मिडरेंज आणि प्रीमियम सेगमेंटचे फोन 5G कनेक्टिव्हिटीसह येत होते. मात्र, आता कंपन्या बजेट सेगमेंटमध्ये 5G फोन आणत आहेत. असाच एक स्वस्त फोन म्हणजे Infinix Hot 20 5G आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. ई-कॉमर्स साईट या 5G डिव्हाइसवर जवळपास 38 टक्के सवलत दिली जात आहे. Infinix Hot 20 5G फोनची मूळ किंमत सुमारे 18,000 रुपये आहे. पण आता स्मार्टफोन डिस्काउंटमध्ये मिळू शकणार आहे.

  EMI वर मिळू शकणार स्मार्टफोन

  4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह Infinix डिव्हाइसच्या बेस व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. मात्र, डिस्काउंटनंतर, फोन फ्लिपकार्टवर 10,999 रुपयांपर्यंत मिळू शकणार आहे. त्याचवेळी, ग्राहक अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड किंवा IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड वापरून EMI व्यवहारांवर अतिरिक्त 10 टक्के सूट मिळू शकते. त्याचवेळी, ग्राहकांना Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक मिळत आहे.

  जुना स्मार्टफोन द्या अन्…

  या बँकेच्या ऑफर्सचा फायदा घेऊन ग्राहक 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत फोन खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर फ्लिपकार्ट स्मार्टफोनवर उत्तम एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे. जुन्या फोनची देवाणघेवाण केल्यास ग्राहकांना 10,400 रुपयांपर्यंत सूटही मिळू शकते. पण, सवलतीची रक्कम तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असते.