smartphone

तुम्हाला उत्तम स्मार्टफोन १५ हजारच्या आसपास खरेदी करायचा असेल तर आता 5G मध्येही उत्तम पर्याय निर्माण झाले आहेत. कमी किमतीत कमालीचे फिचर्स असणारे नेमके फोन कोणते आहेत जाणून घ्या.

  जर तुमचे बजेट 15,000 रुपये किंवा त्याहून कमी असेल आणि तुम्ही असा फोन शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अशाच काही फोनची यादी घेऊन आलो आहोत जे तुम्हाला कमालीचा फायदा करून देतील. या फोनमध्ये कमी किंमत असूनहबी अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. या फोन्समध्ये पॉवरसाठी मोठी बॅटरी देण्यात आली असून या यादीत विवो, मोटोरोलासह अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. 

  15000 किमतीपर्यंतचे उत्तम स्मार्टफोन 

  Moto G34 5G

  Vivo Y28 5G

  POCO M6 5G

  OPPO A59 5G

  LAVA Storm 5G

  हे सुद्धा वाचा

  Moto G34 5G

  moto

  • 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा, हा फोन 5G कनेक्टिव्हिटीसह देण्यात आला आहे
  • त्याच्या 8 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे 
  • परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 इन्स्टॉल करण्यात आला आहे 
  • यात 16MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000 mAh बॅटरी आहे जी 18 वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनला IP52 रेटिंगदेखील मिळाली आहे

  Vivo Y28 5G

  Vivo

  • तुम्ही बजेट सेगमेंटमध्ये जानेवारी 2024 मध्ये लॉन्च केलेला हा फोन देखील खरेदी करू शकता. यामध्ये 5,000 mAh बॅटरी आहे 
  • यात 6.56 इंच HD+ डिस्प्ले, MediaTek डायमेंशन 6020 आणि 50MP प्राथमिक कॅमेरा आहे
  • ज्यांना कमी किमतीत आपल्या नियमित कामासाठी चांगला फोन हवा आहे अशा लोकांसाठी हा फोन सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो
  • हाताळायला हा फोन उत्तम आहे आणि सोपाही आहे

  POCO M6 5G

  Poco

  • Poco चा हा 5G स्मार्टफोन, जो MediaTek Dimensity 6100 Plus chipset वर परफॉर्म करतो
  • हादेखील या किंमतीच्या श्रेणीत एक चांगला पर्याय आहे
  • फोनला उर्जा देण्यासाठी, 18 वॅट चार्जिंगसह कार्य करणारी 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे
  • यात Android 14 ऑपरेटिंग सिस्टम आहे
  • याशिवाय, यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा डिस्प्ले आहे

  OPPO A59 5G

  Oppo

  • 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारा हा फोनही खरेदी करता येईल
  • यात फास्ट चार्जिंगसह मोठी बॅटरी आणि ऑक्टा-कोअर प्रोसेसर आहे 
  • यामध्ये दिलेली रॅम एसएसडी कार्डद्वारेही वाढवता येते
  • कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा फोन नॉर्मल टास्किंगसाठी लाँच केला होता

  LAVA Storm 5G

  Lava

  • देशी कंपनी लावाच्या स्मार्टफोनचाही या यादीत समावेश आहे. Lava Storm 5G 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल
  • यात MediaTek Dimension 6080 चिपसेट आहे
  • सेल्फीसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे आणि पॉवरसाठी 33 वॅट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे