DAILY NEWSVivo Introduces New Colour-Changing Smartphone’s

विशेषत: भारतीय बाजारपेठ ही मोबाइल हँडसेटची जगातील एक मोठी बाजारपेठ असल्याने जगभरातील अनेक नामांकित कंपन्या आपली सर्व स्तरातील ग्राहकवर्गासाठीची उत्पादने आणत असतात. सध्या मोबाइल हँडसेटच्या बाजारपेठेत चर्चा आहे ती चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी विवोच्या काही सेकंदात रंग बदलणाऱ्या स्मार्टफोनची. या अनोख्या फोनची विवोचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत(DAILY NEWSVivo Introduces New Colour-Changing Smartphone’s).

    कोरोनाचे सावट थोडेसे हलके झाल्याने आता जगभरात अर्थव्यवस्था रूळावर येत आहे. त्यामुळे बाजारपेठाही पुन्हा बहरल्या आहेत. उत्पादक कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करतील अशी उत्पादने दाखल करण्याची चुरस लागलेली आहे. स्मार्टफोनची बाजारपेठही यात मागे नाही. ग्राहकांना नवनवीन फीचर्स असणारे अत्यधुनिक स्मार्टफोन घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे अनेक दिग्गज उत्पादक कंपन्या एकापेक्षा एक अनोखे स्मार्टफोन्स दाखल करत असतात.

    विशेषत: भारतीय बाजारपेठ ही मोबाइल हँडसेटची जगातील एक मोठी बाजारपेठ असल्याने जगभरातील अनेक नामांकित कंपन्या आपली सर्व स्तरातील ग्राहकवर्गासाठीची उत्पादने आणत असतात. सध्या मोबाइल हँडसेटच्या बाजारपेठेत चर्चा आहे ती चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी विवोच्या काही सेकंदात रंग बदलणाऱ्या स्मार्टफोनची. या अनोख्या फोनची विवोचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत(DAILY NEWSVivo Introduces New Colour-Changing Smartphone’s).

    व्ही 23 प्रो नावाचा हा स्मार्टफोन असून, तो लवकरच दाखल होणार असल्याचे वृत्त लीकर्स आणि टिपस्टर्सद्वारे प्राप्त झाले आहे. मात्र विवो कंपनीने अद्याप या स्मार्टफोनबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. हा स्मार्टफोन ग्रीकबेंचच्या लिस्टमध्ये दिसला असून, फोनच्या चाचण्या यशस्वी झाल्या असल्याचंही सांगितलं जात आहे. हा स्मार्टफोन पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

    विवोचा हा स्मार्टफोन एकदम अनोखा आहे कारण हा स्मार्टफोन चक्क त्याचा रंग बदलणारा आहे. त्याकरता कोणतेही इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान नाही तर एक विशिष्ट प्रकारचे मटेरियल वापरण्यात आले आहे. हे एक रिअॅक्टिव्ह पद्धतीचे मटेरियल असून त्याचा वापर करून याचे बॅक पॅनल बनवण्यात आले आहे. बॅक पॅनलवर सूर्याचा उजेड पडला की याचा रंग बदलणार आहे.

    विवोने याला ‘चेंजेबल फ्लोराईट ग्लास मटेरियल’ असे नाव दिले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएसवर काम करेल. यात 8GB रॅम असून, MediaTek Dimensity 1200 प्रोसेसरवर चालेल. यात तब्बल 64 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, अशी माहिती आहे.