Reliance Jio युजर्सना 440W चा जोरदार झटका, 480 रुपयांपर्यंत प्लॅन महागले, जाणून घ्या नवीन दर

व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलनंतर आता मुकेश अंबानींच्या Reliance Jio नेही आपले प्रीपेड प्लॅन महाग केले असून, आपल्या युजर्सना हादरा दिला असून आता 1 डिसेंबरपासून नवीन दर योजना लागू होणार आहेत. म्हणजेच, जर तुम्हाला जुन्या किमतीत सेवांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही रिचार्ज करून (30 नोव्हेंबरपर्यंत) जुन्या किमतीचा लाभ घेऊ शकता.

  नवी दिल्ली : Jio Prepaid Plans Price Hike : Vodafone Idea (Vi) आणि Airtel नंतर, आता मुकेश अंबानींची (Mukesh Ambani) टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने देखील आपले प्रीपेड प्लॅन महाग करण्याची घोषणा केली आहे. या लेखात आम्ही तुम्हाला Jio चे कोणते Plans महाग झाले आणि जुन्या किमतीच्या तुलनेत किंमत किती वाढली आहे आणि नवीन दर योजना कधी लागू होतील याची माहिती देणार आहोत.

  Jio Recharge Plans : या दिवसापासून नवीन रेटेड प्लॅन लागू होतील

  व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलनंतर आता मुकेश अंबानींच्या Reliance Jio नेही आपले प्रीपेड प्लॅन महाग केले असून, आपल्या युजर्सना हादरा दिला असून आता 1 डिसेंबरपासून नवीन दर योजना लागू होणार आहेत. म्हणजेच, जर तुम्हाला जुन्या किमतीत सेवांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही रिचार्ज करून (30 नोव्हेंबरपर्यंत) जुन्या किमतीचा लाभ घेऊ शकता.

  Jio Prepaid Plans Price Hike

  आधी सर्वात स्वस्त प्लॅनपासून सुरुवात करूया, आता वापरकर्त्यांना 75 रुपयांच्या Jio प्लॅनसाठी 91 रुपये खर्च करावे लागतील. अमर्यादित प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर आता 129 रुपयांच्या प्लॅनसाठी 155 रुपये, 149 रुपयांच्या प्लॅनसाठी 179 रुपये, 199 रुपयांच्या प्लॅनसाठी 239 रुपये, 249 रुपयांच्या प्लॅनसाठी 299 रुपये, 399 रुपयांच्या प्लॅनसाठी 479 रुपये, 444 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 533 रुपये खर्च करावे लागतील.

  329 रुपयांच्या जिओ व्हॅल्यू प्लॅनची किंमत आता 395 रुपये, 555 रुपयांच्या प्लॅनची ​​666 रुपये, 599 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 719 रुपये, 1299 रुपयांच्या प्लॅनची ​​1559 रुपये आणि 2399 रुपयांच्या प्लॅनसाठी आता तुम्हाला 2,879 रुपये खर्च करावे लागतील म्हणजेच या वार्षिक प्लॅनसाठी एकूण 480 रुपये एक्स्ट्रा मोजावे लागणार आहेत.

  केवळ अनलिमिटेड प्लॅनच नाही तर Jio Data Plans ही महागणार

  51 रुपयांच्या Jio डेटा व्हाऊचरसाठी, आता युजर्सना 61 रुपये, 101 रुपयांच्या प्लॅनसाठी 121 रुपये आणि 251 रुपयांच्या प्लॅनसाठी 301 रुपये खर्च करावे लागतील.