सूर्याचा आत्तापर्यंतचा सर्वात जवळचा फोटो आला समोर; नासाला मिळालं मोठं यश, ७.४० कोटी किलोमीटर लांबीवरुनच दिसतायेत आगीच्या ज्वाळा

एकूण २५ फोटो काढण्यात आल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. ऑर्बिटर सूर्य आणि पृथ्वीतून जात असताना हे फोटो काढण्यात आले. यात सूर्याची बाहेरची कडा आणि ज्वाळा स्पष्टपणे दिसतायेत. हे फोटो काढण्यासाठी ४ तासांचा कालावधी लागला.

    वॉशिंग्टन : सूर्याचा आत्तापर्यंत काढण्यात आलेला सर्वात जवळचा फोटो समोर आला आहे. यात सूर्याच्या पूर्ण तबकडीचा फोटो पाहायला मिळतो. अमेरिका अंतराळ संशोधन संस्था नासा आणि युरोपीय अंतराळ संशोधन संस्था इसा यांच्या सोलार ऑर्बिटरने ७ मार्चला हा फोटो घेतला आहे. सूर्यापासून ७.४० कोटी किलोमीटर अंतरावरुन हा फोटो काढण्यात आला आहे.

    फोटोंसाठी लागले चार तास

    एकूण २५ फोटो काढण्यात आल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. ऑर्बिटर सूर्य आणि पृथ्वीतून जात असताना हे फोटो काढण्यात आले. यात सूर्याची बाहेरची कडा आणि ज्वाळा स्पष्टपणे दिसतायेत. हे फोटो काढण्यासाठी ४ तासांचा कालावधी लागला. प्रत्येक फोटोची टाईल्स तयार होण्यासाठी १० मिनिटांचा कालावधी लागला. या फोटोंत सूर्यातून असंख्य ज्वाळा पेट घेताना प्रत्येक फोटोत दिसतायेत. अंतराळातील हवामानाच्या अंदाजासाठी भविष्यात याचा उपयोग होण्याची शक्यता आहे.

     

    सूर्यावर अनेक वायू असण्याची शक्यता

    सूर्यावर असलेल्या वेगवेगळ्या वायूंचे वेगवेगळे तापमान असण्याची शक्यता आहे. सूर्यावर हायड्रोजनचे १० हजार डिग्री सेल्यिअस तापमान  आहे. कार्बनचे तापमान ३२ हजार डिग्री सेल्सिअस आहे. ऑक्सिजन ३.२० लाख डिग्री सेल्सिअस उष्ण आहे. नियॉनचे तापमान ६.३० लाख डिग्री सेल्सिअस आहे.

    ५० वर्षांत पहिल्यांदा असे फोटो घेतले

    या फोटोंना स्प्रेक्ट्रल इमेजिंग ऑफ द कोरोनल एनवायरमेंटच्या नावाने पेलोडवर कॅप्चर करण्यात आले. हा सोलर ऑर्बिटरचा भाग आहे. सूर्याच्या इतक्या जवळच्या अंतरावरुन काढण्यात आलेले हे गेल्या ५० वर्षांतील पहिलेच फोटो आहेत.