राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार आता कू वर; एमिनन्स आणि ओळख प्रमाणीकरण ह्या दोन्ही सेवा आहेत विनामूल्य उपलब्ध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू ॲप मध्ये सामील झाले आहेत. राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या अधिकृत हँडलवरून सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @pawar_speaks हे कू हँडल जाहीर केले.

  • DCM देवेंद्र फडणवीस, लोकसभा MP सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांच्यासह १२० हून अधिक राजकीय नेते कू वर

मुंबई : राज्यसभेचे प्रमुख सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे नुकतेच भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू ॲप (Koo App) शी जोडले गेले आहेत. त्याचे कू हँडल @pawar_speaks आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा तसेच महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू ॲप मध्ये सामील झाले आहेत. राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या अधिकृत हँडलवरून सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @pawar_speaks हे कू हँडल जाहीर केले. शरद पवार हे भारतीय राजकारणातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक असून ते माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत तसेच त्यांनी अनेक खात्यांचा पदभार सांभाळला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ अल्पावधीतच कू ॲप मध्ये सामील होणारे शरद पवार हे प्रमुख विरोधी पक्ष नेते आहेत.

या मंचावर शरद पवार यांचे स्वागत करताना, कू ॲप चे संस्थापक आणि सीईओ, अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, “शरद पवार यांच्यासारखा प्रमुख नेता कू वर आल्याने आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांचे स्वागत करताना आम्हांला आनंद होत आहे . महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे राजकीय नेते आधीच कू वर आहेत. आम्हांला खात्री आहे की महाराष्ट्रातील अधिकाधिक लोकांना त्यांच्या नेत्यांकडून कू वर मराठी आणि इतर भाषांमध्ये कनेक्ट व्हायला आणि ऐकायला आवडेल. प्रत्येकाला एकमेकांशी जोडण्यासाठी सुरक्षित, पारदर्शक आणि मोफत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यावर आम्ही भर देत राहू.”

आज सर्वात महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांमधील अनेक महत्त्वाचे नेते त्यांच्या मातृभाषेत लोकांशी संपर्क साधण्यासाठी कू ॲप वापरतात. 1800 हून अधिक राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील 8,000 हुन अधिक प्रतिष्ठित व्यक्ती कू ॲपवर सक्रिय आहेत आणि प्लॅटफॉर्मवर लाखो लोकांशी नियमित संपर्क साधत आहेत. या शिवाय, 100,000 पेक्षा जास्त युजर्सनी गेल्या सहा महिन्यांत त्यांची ओळख स्वेच्छेने, विनामूल्य अगदी काही सेकंदात प्रमाणित केली आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्री, नितीन गडकरी, पीयूष गोयल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आणि AIMIM चे वारिस पठाण यांच्यासह महाराष्ट्रातील इतर अनेक नेते कू वर आहेत.

कू ॲप, पात्र अर्जदारांना एमिनन्स हे मोफत तसेच पारदर्शक आणि सु-परिभाषित निकषांच्या आधारे देते. याशिवाय, सर्व युजर्स प्लॅटफॉर्मवर त्यांची ओळख प्रमाणीकृत करू शकतात. महत्वाचे म्हणजे एमिनन्स आणि ओळख प्रमाणीकरण ह्या दोन्ही सेवा विनामूल्य प्रदान केल्या जातात.