WhatsAppकडून यूजर्ससाठी नवीन फिचर; ‘या’ फिचर मुळे अनेक काम होतील अगदी झटपट

    व्हॉट्सॲपवर आता तुम्हाला अनेक फीचर मिळत आहेत, ते म्हणजे  इंस्टेंट मेसेजिंग ॲप या मध्ये मेसेजिंग, कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग आणि मीडिया फाइल सेंड करता येवू शकतात. या सर्वांसोबत आता ॲपवर कोणते ना कोणते नवीन फीचर येत राहते. डेव्हलपर्सने आता या प्लॅटफॉर्म वर असे फीचर जोडले आहे.

    व्हॉट्सॲपचे नवीन फीचर विंडोज बीटा व्हर्जन २.२२४०.१.० वर दिसले आहे. या फीचर अंतर्गत यूजर्सना आणखी एक नवीन साइड बार मिळेल, ज्यामध्ये चॅट लिस्ट, स्टेटस आणि सेटिंग सोबत कॉलिंग ऑप्शन देखील दिसेल. या बटणाच्या मदतीने डेस्कटॉप वापरकर्ते व्हॉट्सॲप कॉलिंगचा आनंदही घेऊ शकतील. चाचणीनंतर लवकरच हे फीचर जारी केले जाईल, अशी अपेक्षा आहे. या फिचरच्या चाचण्या सर्व होत असून लवकर वापरकर्त्यांसाठी वापरता येणार आहे.