व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर; आता कॉल अलर्ट करण्यात येणार बंद, जाणून घ्या सेटिंग

  मेटा कंपनीची मालकी असलेला मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp एक नवे वैशिष्ट्यपूर्ण फिचर आनत आहे. जे युजर्सला कॉल विंडोज बीटावरील कॉलसाठी नोटीफीकेशन्स डिसेबल करण्यास अनुमती देते. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट स्टोर (Microsoft Store) वर उपलब्ध Windows 2.2250.4.0 अपडेटसाठी WhatsApp बीटा इन्स्टॉल केल्यानंतर WhatsApp कॉलसाठी नोटीफीकेशन्स डिसेबल करण्याची नवीन सूवीधा बीटा परीक्षकांसाठी आणली गेली आहे, असे WABetaInfo अहवालात म्हटले आहे.

  WhatsApp फिचर्स आपल्यासाठी उपलब्ध आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी वापरकर्त्यांनी खालील स्टेप्सचा वापर करावा.

  WhatsApp सेटिंग्ज उघडा

  • आता हे वैशिष्ट्य शोधण्यासाठी नेटीफिकेशन्सवर जा
  • आता ते तुमच्या डिव्हाइसवर उपलब्ध आहे की नाही ते तपासा
  • नोटीफिकेशन्स अंतर्गत तुम्हाला सूचना अंतर्गत, जर तुम्हाला या वैशिष्ट्यासाठी पर्याय दिसत असेल, तर तुम्ही तो वापरु शकता. जेणेकरुन येणार्‍या WhatsApp कॉलसाठी नोटीफीकेशन्स ऑफ करता येतील.

   

  m