आता किरकोळ गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात नाही तर; तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून नोंदवता येणार

    सध्या सगळ्याकडे डिजिटल या गोष्टचा वापर मोठ्याप्रमाणात केला जात असल्याच दिसून येत आणि आपल्या रोज्या वापरात देकील यांचा मोठा वाटा आहे. सगळ्या गोष्टी ह्या डिजिटल स्वरुपात होत असता आता तुम्हाला किरकोळ गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी तुम्हाला पोलिस ठाण्यात जाण्याची गरज लागणार नाही; तुम्हा सहज आता तुमच्या मोबाईल फोन वरून आणि कॉम्प्युटरवरून नोंदवू शकता. तसेच ऑनलाईन एफआयआर नोंदण्यासाठी तुम्ही ट्विटचा आधार घेऊ शकता. तसेच देशात डिजिटलायझेशनची लाट सुरू आहे. सर्व सेवा आता इंटरनेटवर उपलब्ध आहेत. सध्या उपलब्ध नसलेल्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यावर काम केले जात आहे. आता आपण घरी बसून कोणतीही वस्तू ऑनलाइन खरेदी करू शकतो, कोणत्याही विभागाच्या सेवा वापरू शकतो. खासगी सेवांसोबतच सरकारी सेवाही ऑनलाइन उपलब्ध आहेत. तुम्ही जवळपास सर्वच विभागांमध्ये ऑनलाइन प्रवेश करू शकता. मध्य प्रदेश सरकारने पोलिस सेवाही ऑनलाइन केल्या आहेत.