one plus open

वनप्लस ओपन या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ड्युएल डिस्प्ले मिळू शकतो. आतील बाजूचा डिस्प्ले हा 7.8 इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो. तसेच बाहेरील डिस्प्ले हा 6.31 इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो.

    वन प्लस कंपनी (One Plus Open) भारतात आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन ‘वन प्लस ओपन’ लॅान्च करणार आहे.  उद्या म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी वन प्लस ओपन भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने लॉन्चिंगची तारीख जाहीर केली असून इव्हेंटच्या आधीच या फोनचे तपशील लीक झाले आहेत. (One Plus Smartphone)


    या स्मार्टफोनमध्ये काय असू शकतं ?
    वनप्लस ओपन या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ड्युएल डिस्प्ले मिळू शकतो. आतील बाजूचा डिस्प्ले हा 7.8 इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो. तसेच बाहेरील डिस्प्ले हा 6.31 इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो. लीक झालेल्या माहितीनुसार, या दोन्ही डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा 120 Hz इतका असू शकतो. अपकमिंग वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोन जुन्या अँड्रॉइड 13 OS वर चालतो.

    हुड अंतर्गत वनप्लस ओपनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेटचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोन LPDDR5x रॅम आणि 4.0 स्टोरेजच्या स्पोर्टसह लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच युजर्सना यामध्ये 16 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेजचा सपोर्ट मिळू शकतो. अलर्ट स्लायडर हे फिचर देखील यात मिळू शकते. तसेच फोनमध्ये 4800 mAh क्षमतेची बॅटरी आणि 67W चे फास्ट चार्जिंग देखील मिळू शकते.

    लीक झालेल्या माहितीनुसार, वनप्लस ओपनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. ज्यात 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 64 मेगापिक्सेलची पेरीस्कोप लेन्स असू शकते. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 32 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 20 मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा मिळू शकतो.

    वनप्लस कंपनी आपला वनप्लस ओपन हा फोल्डेबल स्मार्टफोन 19 ऑक्टोबर रोजी लॉन्च होणार आहे. वनप्ल ओपनच्या लॉन्चिंग इव्हेंट हा मुंबईत होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा इव्हेंट सुरू होणार आहे. वनप्लस कंपनीने या आधीच एक्स वर पोस्ट करून लॉन्चिंगची तारीख आणि वेळ सांगितली होती. वनप्लस ओपन ची किंमत अंदाजे 1,39,999 रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र हा केवळ अंदाज आहे. खरी किंमत ही लॉन्चिंग इव्हेंटमध्ये कळू शकणार आहे. तसेच हा फोन लॉन्च झाल्यानंतर 27 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.