पेटपूजाने रेस्टॉरंट मार्केटिंग टूल ट्विटो केले लॉन्च 

रेस्टॉरंट्सच्या बिल्सच्या सूचीचे व्यवस्थापन करण्यासाठी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणा-या अद्ययावत पीओएस (पॉइंट ऑफ सेल) नेक्स्ट-जनरेशन रेस्टॉरंट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म पेटपूजाने ट्विटो (Tvito) हे आपले क्रांतिकारी रेस्टॉरंट मार्केटिंग टूल बाजारात आणले आहे. २० हून अधिक क्युझिन्सच्या छायाचित्रांचे ५०,००० हून अधिक टेम्प्लेट्स देणारे हे साधन रेस्टॉरंट्सना डिजिटल मार्केटिंगद्वारे अगदी साध्यासोप्या पद्धतीने ग्राहकांशी संपर्कं साधण्याची क्षमता मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

    मुंबई: वर्षभराच्या संशोधनानंतर पेटपूजा टीमला असे आढळून आले की, ३०-४० टक्‍के रेस्टॉरंट्सच्या बाबतीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर डिजिटल मार्केटिंग न केल्याने व्यवसायाच्या अनेक संधी त्यांच्या हातून निसटून जातात. ही रेस्टॉरंट्स एका ग्राफिकवर सरासरी ३०० रुपये खर्च करतात, व या गोष्टीला उशीर झाला तर हा खर्च गुंतवणूकीचे साधन बनू शकत नाही. केलेल्या खर्चाचे इष्टतम मूल्य मिळण्यास मदत व्हावी यासाठी पेटपूजा निर्मित ट्विटो रेस्टॉरंट मालकांना त्यांच्या स्मार्टफोन्सवर मिनिटांत सुयोग्य मजकूर आणि डिझाइनचे पर्याय पुरवू शकेल.

    रेस्टॉरंट्ससाठी डिजिटल मार्केटिंगचा चेहरामोहराच बदलून टाकणा-या या टूलचे वैशिष्ट्य आहे त्याचा साधेपणा! केवळ तीन क्लिक्ससरशी रेस्टॉरंट मालकांना सोशल मीडियावर जाहिरातपर ग्राफिक टाकता येईल. इतकेच नव्हे तर निवडलेल्या टेम्प्लेटमधील मजकूर आणि इमेज, त्यांची जागा आकार बदलण्याची, लोगोचा आकार कमी-जास्त करण्याची, पदार्थांच्या इमेज एडिट करण्याची आणि या इमेज आपल्या सोशल मीडिया पेजेसवर थेट शेअर करण्याचीही सोय यात आहे. रोखठोक, यूजर-फ्रेंडली इंटरफेस असलेल्या ट्विटोमुळे रेस्टॉरंट मालकांना आणि त्याच्या कर्मचा-यांनाही सोशल मीडिया मार्केटिंग अगदी विनासायास सांभाळता येते.

    पेटपूजाच्या न्यू इनिशिएटिव्ह विभागाचे व्हीपी तपन पटेल म्हणाले, “भारतामध्ये खान-पान उद्योग अगदी अफाट वेगाने विस्तारत आहे आणि नवनवी रेस्टॉरंट्स सतत सुरू होत आहेत. या क्षेत्रातील तीव्र स्पर्धा पाहता रेस्टॉरंट्सनी आपल्या ग्राहकांशी चांगल्या प्रकारे संपर्क साधणे गरजेचे झाले आहे आणि या कामामध्ये त्यांना कन्टेन्ट व डिझाइन या साधनांची मदत होत आहे. पेटपूजा निर्मित ट्विटोच्या साथीने रेस्टॉरंट्सना एका आगळ्यावेगळ्या, तरीही प्रभावशाली पद्धतीने आपल्या ग्राहकांशी संवाद साधता येईल. ट्विटोची रचना आम्ही कटाक्षाने सहज वापरता येण्याजोग्या अॅपसारखी केली आहे, जेणेकरून स्टाफ आणि रेस्टॉरंट्सना ग्राहकांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचण्यासाठी व आपल्याशी जोडून घेण्यासाठी या साधनाचा लाभ घेता यावा. ट्विटो वापरणा-यांकडून आम्हाला अप्रतिम प्रतिसाद मिळूही लागला आहे आणि हे साधन अधिक चांगल्या प्रकारे चालावे यासाठी आम्ही त्यात सतत सुधारणा करत राहणार आहोत.”