प्लेने ‘प्लेफिट स्लिम२सी’ स्मार्टवॉच केले लाँच

या स्मार्टवॉचमध्ये स्लिम फॉर्म फॅक्टर असले तरी ५ दिवसांपर्यंत अविरत प्लेटाइमची खात्री देते. या स्‍लीक नवोन्मेष्कारी उत्पादनामध्ये तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत वैशिष्ट्यांची व्यापक श्रेणी आहे, जे आधुनिक ग्राहकांच्या चालता-फिरता जीवनशैली गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.

  मुंबई : डिझाइन-इन-इंडिया (Design In India) मोहिमेला प्रबळ करण्यासाठी आणि भारतीय ग्राहकांना किफायतशीर दरांमध्ये उच्च दर्जाची टेक्नोलॉजिकल उत्पादने (Technological Products) देण्यासाठी प्ले (Play) या भारतातील प्रिमिअमली स्टाइल, किफायतशीर, पण टिकाऊ एआयओटी उत्पादनांच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने त्यांचे नवीन स्मार्टवेअर उत्पादन ‘प्लेफिट स्लिम२सी’ (PlayFit Slim 2C) लाँच केले आहे.

  आपल्या नावाशी बांधील राहत हा नेक्स्ट-जनरेशन वेअरेबल तंत्रज्ञान भारतीय ग्राहकांसाठी रिस्टवेअरमध्ये (Wristwear) निर्माण करण्यात आलेला स्लिम टेक्नोलॉजी आविष्कार आहे, ज्यामधून पारंपारिक डिझाइनर वॉचच्या तुलनेत स्मार्टवॉचसाठी वाढती लोकप्रियता दिसून येते. नवीन स्मार्टवॉचसाठी फॅशन-डिझाइनर वॉचेसमधून प्रेरणा घेण्यात आली आहे.

  PlayFit Slim 2C फक्त ३९९९ रूपये या परवडणाऱ्या किंमतीमध्ये प्लेची अधिकृत वेबसाइट आणि सर्व प्रमुख ई-कॉमर्स व्यासपीठ जसे ॲमेझॉन (Amazon) व फ्लिपकार्टवर (Flipkart), तसेच देशभरातील ५०,००० ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल.

  प्लेफिट स्लिम२सी (PlayFit Slim 2C) हा ब्ल्यूटूथ आधारित कॉलिंग स्मार्टवॉच (Calling Smartwatch) आहे, ज्यामध्ये १.३ इंच फॅशनेबल व सर्क्युलर डायलसह आकर्षक आयपीएस डिस्प्ले आहे. डिझाइनच्या परिपूर्ण पॅकेजमध्ये आकर्षक ५०० नीट्स ब्राइटनेस डिस्प्ले, आयपीएस पॅनेल आहे, जे डिस्प्लेच्या वरील बाजूस असलेल्या २.५डी ग्लासमुळे फ्लॅट डायल पृष्ठभागावर सर्व कोनातून दृश्यमानता देते. या स्मार्टवॉचमध्ये स्लिम फॉर्म फॅक्टर असले तरी ५ दिवसांपर्यंत अविरत प्लेटाइमची खात्री देते. या स्‍लीक नवोन्मेष्कारी उत्पादनामध्ये तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत वैशिष्ट्यांची व्यापक श्रेणी आहे, जे आधुनिक ग्राहकांच्या चालता-फिरता जीवनशैली गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.

  स्मार्ट वेअर माएस्ट्रो प्लेफिट स्लिम२सी हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन, ब्लड-प्रेशर, दर्जात्मक पेडोमीटर, सेडेण्टरी अलर्ट व स्लीप मॉनिटरिंग पॅटर्न्स बाबत रिअल-टाइम नोटिफिकेशन्स देते. हे स्मार्टवॉच वापरकर्त्यांसाठी डिजिटल डिस्प्ले म्हणून देखील काम करते, ज्यामधून व्हायब्रेशनच्या माध्यमातून एसएनएस नोटिफिकेशन्स आणि वेदर अपडेट्स, हायड्रेशन रिमांइडर इत्यादींसारखे इतर स्मार्ट अपडेट्स मिळतात.

  फिटनेस उत्साहींसाठी स्मार्टवॉचमध्ये कॅलरी मॉनिटर आहे, जे त्यांच्या फिटनेस नित्यक्रमादरम्यान कमी झालेल्या कॅलरींवर देखरेख ठेवण्यासोबत त्याबाबत माहिती देते. सतत बदलणारी परिसंस्था पाहिजे असलेल्या ग्राहकांसाठी स्मार्टवॉचमध्ये अनेक क्लाऊड-होस्टेड वॉच फेसेस आहेत, जे इन-हाऊस विकसित कॉम्पॅनियन ॲप प्लेफिटचा वापर करत बदलता येऊ शकतात. प्लेफिट स्लिम२सी शॅम्पेन व ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.