Power generation from the leaves of sago plant

येथील एका संशोधकाने साबुदाणा वनस्पतीच्या पानांपासून यशस्वीपणे विजेची निर्मिती केली आहे. या प्रक्रियेत उत्सर्जित होणारे कार्बन डायऑक्साइड रोखण्यातही त्यांनी यश मिळवले आहे. साबुदाणा वनस्पतीपासून स्पिरीट तयार करण्यासाठी आवाहन करण्यात येत असतानाच तिरुअनंतपुरम येथील डॉ. सी.ए. जयप्रकाश या संशोधकाने या वनस्पतीच्या पानांपासून वीज तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे(Power generation from the leaves of Sago Plant).

    तिरुअनंतपुरम : येथील एका संशोधकाने साबुदाणा वनस्पतीच्या पानांपासून यशस्वीपणे विजेची निर्मिती केली आहे. या प्रक्रियेत उत्सर्जित होणारे कार्बन डायऑक्साइड रोखण्यातही त्यांनी यश मिळवले आहे. साबुदाणा वनस्पतीपासून स्पिरीट तयार करण्यासाठी आवाहन करण्यात येत असतानाच तिरुअनंतपुरम येथील डॉ. सी.ए. जयप्रकाश या संशोधकाने या वनस्पतीच्या पानांपासून वीज तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे(Power generation from the leaves of Sago Plant).

    डॉ. जयप्रकाश हे सेंट्रल ट्युबर क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम करतात. डॉ. जयप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाला अणुऊर्जा विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या वनस्पतीवर संशोधन करत असताना पाने फेकून दिली जात होती. त्यावेळी या पानांपासून वीज तयार करता येईल, अशी कल्पना आपल्याला सुचली, असे ते सांगतात.

    सात किलो पानांपासून एक किलोवॅट

    जैवकचऱ्यापासून मिथेन तयार केले जाते. पण पाने ही मिथेन उत्पादनासाठी फारशी उपयुक्त नसतात, असे ते म्हणाले. या पानांचा अर्क काढत असताना विषाणू वाढत असतो. हे एक आव्हान असते. दुसरे म्हणजे, या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होत असतो आणि हायड्रोसल्फाइडचेही कण बाहेर पडत असतात. त्यावरही आपण मात केली, असे डॉ.जयप्रकाश सांगतात.

    गाळण्याच्या प्रक्रियेतून कार्बन वेगळा करण्यात आला.अखेरीस मिथेन वायू फुग्यांमध्ये साठवण्यात आला आणि जनरेटरच्या साह्याने वीज तयार करण्यात आली. या प्रक्रियेत सात किलो पानांपासून एक किलोवॅट वीज निर्माण केली जाऊ शकते. एक हेक्टर जमिनीवर पाच टन पाने आणि मुळे वाया जातात, असेही त्यांनी सांगितले.