redmi note 12

रेडमी नोट 12 5 जी मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + AMOLED डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट हा 120 Hz इतका आहे. या फोनमधील डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास 3 चे संरक्षण देण्यात आले आहे.

    अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांनी सेलची घोषणा केली आहे. येत्या 8 ऑक्टोबरपासून अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल (Amazon Great Indian Festival Sale) आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल (Flipcart Big Billion Day Sale) सुरु होणार आहे. फ्लिपकार्ट प्लस आणि अ‍ॅमेझॉन प्राइमचे सदस्य असणाऱ्यांना या सेलमध्ये एक दिवस आधी 7 तारखेपासूनच प्रवेश मिळणार आहे. या दोन्ही वेबसाइटकडून अनेक गोष्टींवर डिस्काउंट मिळणार आहे.

    सेल सुरु होण्याआधीच फ्लिपकार्ट आणि Amazon ने काही ऑफर्सबाबत खुलासा केला आहे. या ऑफर्सनुसार, दोन्ही वेबसाइट रेडमी नोट 5जी या स्मार्टफोनवर डिस्काउंट देत आहे. रेडमी नोट 5 जी स्मार्टफोन ऑगस्ट महिन्यात लॉन्च झाला आहे. रेडमी नोट 5जी ची 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे.

     फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवरील डिस्काउंट
    फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर फेस्टिव्हल सेल आधी रेडमी नोट 12 5जी या फोनचे 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणारे व्हेरिएंट भारतात 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉनवरील एका फोटोनुसार या फोनसाठी डिस्काउंट , अतिरिक्त बँक ऑफर्स आणि एक्सचेंज या पर्यायांचा समावेश आहे. तर फ्लिपकार्ट रेडमी नोट 5 जी चे तेच मॉडेल 10,799 रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहे. ज्यामध्ये ट्रेड इन अलाउन्सचा समावेश आहे. हा स्मार्टफोन Frosted Green, Matte Black, आणि Mystique Blue या तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

    फीचर्स
    रेडमी नोट 12 5 जी मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + AMOLED डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट हा 120 Hz इतका आहे. या फोनमधील डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास 3 चे संरक्षण देण्यात आले आहे. या फोनमध्ये Qualcomm च्या Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. ज्यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. यात 5000 mAh क्षमतेची बॅटरी आणि 33 W च्या फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.यामध्ये यूएसबी टाइप -सी पोर्टचा सपोर्ट आहे.