रेशामंडीने आयओएस डिव्हाइसेससाठी सुरु केले आपले सुपर ॲप

रेशामंडी ॲपची सुरुवात २०२० साली झाली आणि तेव्हापासून आजतागायत या ॲपचा वापर करणरे शेतकरी, रीलर्स, यार्न उत्पादक, विणकर आणि रिटेल विक्रेत्यांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात सर्व हितधारकांनी या ॲपसोबत स्थापन केलेले संबंध रेशामंडीकडून आपल्या हितधारकांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना व्यवसायामध्ये अजून व्यापक संधी प्रदान करण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न दर्शवतात.

  • इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू आणि मराठीमध्ये या ॲपचा करता येणार उपयोग

बंगलोर : भारतात प्राकृतिक धाग्यांसाठी सर्वात मोठी, फार्म-टू-फॅशन डिजिटल इकोसिस्टिम (The Farm-To-Fashion Digital Ecosystem), रेशामंडीने (Reshamandi) नुकतेच आपले ॲप सुरु केले आहे जे आयओएस डिव्हाइसेसवर काम करेल. सध्या रेशामंडीच्या ३४००० हितधारकांनी हे ॲप इन्स्टॉल केले असून, त्यांच्यापैकी ४०% लोकांनी ॲपच्या पेमेंट सिस्टिमचा उपयोग केला आहे आणि त्यांना पेमेंटची पावती ॲपवर मिळाली आहे. रेशामंडीचे नवे आयओएस ॲप इंग्रजीव्यतिरिक्त पाच भारतीय भाषांमध्ये हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू आणि मराठीमध्ये उपलब्ध आहे.

सध्या रेशामंडीचे ९५% शेतकरी या प्लॅटफॉर्मवर व्यवहारांचे मॅपिंग (Mapping of Transactions) करण्यासाठी ॲपचा वापर करत आहेत. विणकर समुदायाने या ॲपवर ५००० पेक्षा जास्त साडी एसकेयू सूचिबद्ध केले असून, त्यामुळे आता ते एका खूप मोठ्या रिटेलर बेससोबत थेट संपर्क साधू शकतात आणि त्यांना उत्पादने वितरित करण्यात सक्षम आहेत. या ॲपवर साडी, कपडे, घर व जीवनशैली आणि कापड या चार व्यापक श्रेणींमध्ये साहाय्य प्रदान केले जात आहे.

रेशामंडीचे संस्थापक व सीईओ मयंक तिवारी यांनी सांगितले, “आर्थिक तंत्रज्ञान आणि डिजिटायजेशन यांचा मिलाप झाल्यामुळे कापड उद्योगक्षेत्रासाठी एक नवे विकास मॉडेल तयार झाले आहे. आम्ही डिजिटायजेशनमार्फत पुरवठा शृंखलेमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दिशेने सक्रिय प्रयत्न करत आहोत. आम्ही एक असे सुपर ॲप बनवू इच्छितो जे स्पिनर्स, जीनर्स, शेतकरी, मिल्स, वितरकांसहित सर्व हितधारकांना उद्योगव्यवसाय अधिक कार्यशील बनवण्यासाठी आणि एका मंचाच्या माध्यमातून खरेदी विक्री करण्यात सक्षम बनवते. आम्हाला हे पाहून आनंद होत आहे की, मूल्य शृंखलेमध्ये आमचे हितधारक रेशामंडी ॲपला समजून घेत आहेत आणि त्याचा उपयोग करत आहेत.”

रेशामंडी ॲपची सुरुवात २०२० साली झाली आणि तेव्हापासून आजतागायत या ॲपचा वापर करणरे शेतकरी, रीलर्स, यार्न उत्पादक, विणकर आणि रिटेल विक्रेत्यांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात सर्व हितधारकांनी या ॲपसोबत स्थापन केलेले संबंध रेशामंडीकडून आपल्या हितधारकांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना व्यवसायामध्ये अजून व्यापक संधी प्रदान करण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न दर्शवतात. ॲपच्या माध्यमातून २०,००० टन कोकुन, १,५०० टन कापूस, ६,००० टन कापूस गाठी, ८ लाख साड्या, ५ लाख कपडे आणि १५० लाख मीटर कापड यांची विक्री आणि व्यवहार करण्यात आले आहेत.