dentist clinic

भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) आणि त्यांच्या इनक्यूबेटेड स्टार्टअप-थेरानॉटिलसच्या संशोधकांनी नॅनो रोबो विकसित केले आहेत. चुंबकीय क्षेत्राचा उपयोग करून विकसित करण्यात आलेले हे नॅनो रोबो आता दंत नलिकांच्या आत जाऊन तेथील जीवाणूंना नष्ट करण्यासाठी मदत करतील. तसेच रूट कॅनल उपचाराच्या यशाचा दरही वाढवतील(Robot Will Do Root Canal ).

    दिल्ली : भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) आणि त्यांच्या इनक्यूबेटेड स्टार्टअप-थेरानॉटिलसच्या संशोधकांनी नॅनो रोबो विकसित केले आहेत. चुंबकीय क्षेत्राचा उपयोग करून विकसित करण्यात आलेले हे नॅनो रोबो आता दंत नलिकांच्या आत जाऊन तेथील जीवाणूंना नष्ट करण्यासाठी मदत करतील. तसेच रूट कॅनल उपचाराच्या यशाचा दरही वाढवतील(Robot Will Do Root Canal).

    दातांमधील संक्रमणाच्या उपचारासाठी रूट कॅनल प्रक्रिया नियमित उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रक्रियेत दातांमधील संक्रमित नरम ऊतींना (पल्प) हटवले जाते आणि संक्रमणाला कारणीभूत जीवाणूंना नष्ट करण्यासाठी अँटिबायोटिक किंवा रसायनांच्या सहाय्याने दातांना फ्लश केले जाते. मात्र, अनेक वेळा तेथील जीवाणू पूर्णपणे नष्ट होत नाहीत. एंटरोकोकस फेकलिससारखे अँटिबायोटिक रोधक क्षमता असलेले जीवाणू यामध्ये प्रामुख्याने असतात जे दातांच्या सूक्ष्म दंतनलिकांमध्ये लपून राहतात.