Discovery of ultraviolet stars in the galaxy; Maximum of Indian astronomers

ब्रह्मांडाच्या या अनंत पसाऱ्यात अनेक आकाशगंगा असतात. अशा आकाशगंगांमध्ये अनेक तारे व ग्रह असतात. आपली पृथ्वी किंवा ग्रहमालिका ज्या आकाशगंगेचा एक भाग आहे तिला ‘मिल्की वे’ (दुग्धमेखला) आकाशगंगा म्हटले जाते. या आकाशगंगेत भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी आकर्षक दिसणार्‍या विशाल गोलाकार ‘एनजीसी 2808’ क्लस्टरमध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) स्टार्स’ म्हणजेच अतिनील ताऱ्यांचा शोध घेतला आहे(Discovery of ultraviolet stars in the galaxy; Maximum of Indian astronomers).

    या तारकापुंजाबाबत असे म्हटले जाते की यामध्ये तार्‍यांच्या पाच पिढ्या असतात. बंगळूरच्या भारतीय ताराभौतिकी संस्थान (आयआयए) मधील संशोधकांच्या एका पथकाने भारताच्या पहिल्या मल्टी-वेव्हलेंग्थ स्पेस उपग्रह ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’वरील ‘अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’चा वापर करून हा शोध लावला आहे. सप्टेंबर 2021 मध्ये ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ने आपल्या कक्षेत सहा वर्षे पूर्ण केली आहेत.

    संशोधकांनी म्हटले आहे की या ताऱ्यांचा आंतरिक कोअर त्यांना अतिशय उष्ण बनवत असतो. हे तारे सूर्यासारखा एक पूर्ण तारा बनण्याच्या प्रक्रियेतील शेवटच्या टप्प्यात आहेत. असे तारे कशाप्रकारे नष्ट होतात हे अद्याप समजलेले नाही. जे तारे शोधले आहेत त्यापैकी एक तारा अतिनील प्रकाशात सूर्यापेक्षाही तीन हजार पटीने अधिक तेजस्वीपणे चकाकतो. त्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे एक लाख केल्विन इतके आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022