सिग्निफायकडून भारतात खास आकाराचे फिलिप्‍स ओ-बल्‍स व हेक्‍सा-बल्‍ब लाँच

दोन्‍ही बल्‍ब्‍समध्‍ये सुलभ प्‍लग-एन-प्‍ले फॉर्म आहे, ज्‍यामुळे हे बल्‍ब्‍स विद्यमान एलईडी बल्‍ब्‍स सॉकेट्समध्‍ये सहजपणे इन्‍स्‍टॉल करता येऊ शकतात. तुमच्‍या डोळ्यांना आरामदायी वाटेल अशा स्‍वरूपात डिझाइन करण्‍यात आलेले हे बल्‍ब्‍स नियमित वक्राकार-आकाराच्‍या एलईडी बल्‍ब्‍सच्‍या तुलनेत व्‍यापक भागापर्यंत प्रकाश प्रसारित करतात.

  नवी दिल्‍ली : सिग्निफाय (Signify) (युरोनेक्‍स्‍ट: LIGHT) या लायटिंगमधील जागतिक अग्रणी कंपनीने भारतात दोन खास आकाराचे एलईडी बल्‍ब्‍स – फिलिप्‍स हेक्‍सा-बल्‍ब आणि ओ-बल्‍ब लाँच केले आहेत. षटकोनी व गोलाकार आकाराचे बल्‍ब्‍स डेकोरेटिव्‍ह लाइट्स म्‍हणून वापरता येऊ शकतात, ज्‍यामधून तुमच्‍या घरातील लिव्हिंग स्‍पेसच्‍या सुशोभितपणामध्‍ये अधिक आकर्षकतेची भर होऊ शकते आणि सामाजिक कार्यक्रम असो किंवा प्रियजनांसोबत उत्तम वेळ व्‍यतित करायचा असो परिपूर्ण वातावरणाची निर्मिती होते.

  दोन्‍ही बल्‍ब्‍समध्‍ये सुलभ प्‍लग-एन-प्‍ले फॉर्म आहे, ज्‍यामुळे हे बल्‍ब्‍स विद्यमान एलईडी बल्‍ब्‍स सॉकेट्समध्‍ये सहजपणे इन्‍स्‍टॉल करता येऊ शकतात. तुमच्‍या डोळ्यांना आरामदायी वाटेल अशा स्‍वरूपात डिझाइन करण्‍यात आलेले हे बल्‍ब्‍स नियमित वक्राकार-आकाराच्‍या एलईडी बल्‍ब्‍सच्‍या तुलनेत व्‍यापक भागापर्यंत प्रकाश प्रसारित करतात.

  या लाँचबाबत बोलताना सिग्निफायचे (साऊथ एशिया) मुख्‍य कार्यकारी अधिकारी व व्‍यवस्‍थापकीय संचालक सुमित जोशी म्‍हणाले, “लायटिंगमधील जागतिक अग्रणी म्‍हणून सिग्निफाय नेहमीच नवोन्‍मेष्‍कारामध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे. भारतात टी-बल्‍ब श्रेणी यशस्‍वीरित्‍या निर्माण केल्‍यानंतर आम्‍हाला नाविन्‍यपूर्ण आकाराच्‍या एलईडी बल्‍ब्‍सची आमची नवीन श्रेणी – फिलिप्‍स हेक्‍सा-बल्‍ब व ओ-बल्‍ब लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. या बल्‍ब्‍सची स्‍लीक डिझाइन तुमच्‍या घरातील इंटीरिअर्सना सुशोभित करू शकते, तसेच आयकम्‍फर्ट टेक्‍नोलॉजीमुळे तुमच्‍या डोळ्यांना या बल्‍ब्‍समधून प्रसारित होणाऱ्या प्रकाशाचा त्रास देखील होत नाही.’’

  फिलिप्‍स हेक्‍सा-बल्‍ब १६ वॅट, १५०० ल्‍यूमेन व्‍हेरिएण्‍टमध्‍ये उपलब्‍ध आहे आणि फिलिप्‍स ओ-बल्ब सध्‍या २० वॅट, १८०० ल्‍यूमेन्‍स व्‍हेरिएण्‍टमध्‍ये उपलब्‍ध आहे. दोन्‍ही बल्‍ब्‍स सर्व लहान व मोठ्या स्‍वरूपाच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये आणि ई-कॉमर्स व्‍यासपीठावर अनुक्रमे ९९९ रूपये व ११९९ रूपये किंमतीत आकर्षक सफेद रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहेत.

  ठळक वैशिष्ट्ये:

  • वैशिष्‍ट्यपूर्ण गोलाकार व षटकोनी आकाराचे एलईडी बल्‍ब्‍स तुमच्‍या घराच्‍या सजावटीमध्‍ये अधिक सुशोभितपणाची घालणार भर
  • सुलभ प्‍लग-ॲण्‍ड-प्‍ले डिझाइन असलेले हे बल्‍ब्‍स विद्यमान एलईडी बल्‍ब सॉकेट्समध्‍ये फिट बसतात