Supermoon tonight; The moon will be 14 percent bigger and 30 percent brighter

१४ जून रोजी जेष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा ही पौर्णिमा दरवर्षी साजरी केली जाते. मात्र यंदाच्या वर्षी हा पौर्णिमेचा चंद्र सुपर मून दिसणार आहे. आज दिसणारा चंद्र हा १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक प्रखर दिसणार आहे. यंदाच्या वेळी चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे हा सुपरमून इतर पौर्णिमेपेक्षा मोठा आणि प्रखर दिसणार आहे. जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी या बाबतची माहिती दिली आहे(Supermoon tonight The moon will be 14 percent bigger and 30 percent brighter).

    यंदाचा जेष्ठ पौर्णिमेचा चंद्र हा सुपरमून म्हणून पाहायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षी जेष्ठ पूर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे हा सुपरमून इतर पौर्णिमेपेक्षा १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक प्रखर दिसणार आहे. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे. हा सुपरमून जेष्ठ पौर्णिमेच्या रात्री म्हणजेच १४ जून रोजी संपूर्ण रात्रभर पाहायला मिळणार आहे. तसेच हा सुपरमून साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. त्यामुळे सर्वांनी रात्रभर हा सुपरमून पाहण्याची संधी सोडू नका असा आवाहन जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ सोमण यांनी केले आहे.

    पृथ्वीपासून चंद्र हा सर्वसाधारण ३ लक्ष ८४ हजार किलो मीटर अंतरावर असतो. मात्र यंदाच्या जेष्ठ पौर्णिमेला हा चंद्र पृथ्वीच्या जवळ म्हणजेच ३ लाख ५७ हजार ४३४ किलोमीटर अंतरावर येणार आहे. त्यामुळे हा सुपरमून इतर पौर्णिमेपेक्षा १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक प्रखर दिसणार आहे. तसेच पुढच्या महिन्यात आषाढी पौर्णिमेला देखील हा सुपरमून पाहण्याची संधी मिळणार आहे.

    सध्या पावसाळ्याचे दिवस असणार आहेत. तसेच ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी हा चंद्र पाहता येणार नसल्याने आज रात्री हा सुपरमून पाहायला विसरू नये, असा संदेश सोमण यांनी दिला आहे.

    चंद्र पृथ्वी भोवती भ्रमण करताना अंडाकृती मार्गाने फिरत असतो, त्यामुळे तो कधी जवळ तर कधी दूर जातो. जेंव्हा जवळ येतो तेव्हा तो मोठा आणि प्रकाशमान दिसतो यालाच सुपरमून असे म्हणतात. जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा तो एका सपाट वर्तुळाच्या (अंडाकृती किंवा लंबवर्तुळाच्या) मार्गाचा अवलंब करतो आणि पृथ्वीपासून चे कमीतकमी अंतर 357,000 किमी (222,000 मैल) आणि जास्तीत जास्त 406,000 किमी (252,000 मैल) (येथे पृथ्वी आणि चंद्र) दरम्यान बदलते अंतर असते. ह्या पौणिमेचा 99.88% भूभाग प्रकाशमान असेल.