tech neck syndrome

इंडियन स्पायनल इंज्युरीज सेंटरचे मेडिकल डायरेक्टर डॉ. एच. एस. छाबडा यांनी सांगितलं की, लॅपटॉप किंवा मोबाईलवर सलग खूप वेळ बसून मेसेज करत बसल्यामुळे मानेचे सांधे, स्नायू यांच्यावर जास्त भार येतो. तुमचं पोश्चर नीट नसेल तर हा त्रास जास्त होतो.

    नवी दिल्ली: आजच्या काळात स्मार्टफोन (Smartphone) आणि लॅपटॉपचा (Laptop) वापर खूप वाढला आहे. गॅजेटमुळे सोय तर झाली आहे मात्र काही आजारही यामुळे वाढू लागले आहेत. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मुलांपासून सुटका व्हावी म्हणून स्मार्टफोन त्यांच्या हातात देत असाल तर तुमच्यासाठी हा रिपोर्ट म्हणजे धोक्याची घंटा आहे.

    अमेरिकेतील प्लॅस्टीक सर्जन डॉ. रिचर्ड वेस्ट्रीच यांनी स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे होणाऱ्या आजारांबद्दल माहिती दिली आहे. डॉ. रिचर्ड यांचं म्हणणं आहे की, स्मार्टफोनच्या अति वापरामुळे हात सुन्न होणं तसेच झिणझिण्या येणं असे त्रास सुरु होऊ लागतात. डॉ. वेस्ट्रीच यांचं म्हणणं आहे की, हा नवा टेक नेक नवा कार्पल टनल सिंड्रोम (Tech Neck Syndrome) आहे.

    साधारण 20 टक्के रुग्णांना टेक नेकचा त्रास
    या सिंड्रोममध्ये फक्त डोकेदुखीच नाही तर मान दुखणं आणि खांदा दुखणं तसेच हाताता झिणझिण्या येणं अस त्रास सुरु होतात. डॉक्टर्सचं म्हणणं आहे की, भारतात टेक नेक( ज्याला टेक्स्ट नेकसुद्धा म्हटलं जातं) (Text Neck Syndrome) खूप कॉमन आहे. डॉक्टर सांगतात की, ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी साधारण 20 टक्के रुग्ण टेक नेकमुळे पीडित आहेत. यात सगळ्यात काळजीचं कारण हे आहे की, यापैकी जास्त रुग्ण ही लहान मुलं आहेत. अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे टेक नेक बळावू शकतो. त्यातील बहुतांश जीवनशैलीशी निगडीत आहेत. मुलं आजकाल पुर्वीपेक्षा जास्त वेळ गॅजेटसोबत घालवत आहेत.

    दिल्लीतील डॉ.आशिष चौधरी सांगतात की, ऑनलाईन शाळेमुळे लॅपटॉपवर काम करत बसण्याचं प्रमाण वाढलं आहे. पोश्चर, शारिरीक हालचाली कमी होणं, ऊन न मिळणं आणि खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी यामुळे टेक नेकचं प्रमाण वाढलं आहे. डॉ. चौधरी सांगतात की, सगळ्यात टेन्शन वाढवणारी बाब ही आहे की पुर्वी हा त्रास मध्यमवयीन तरुणांना होत होता. आता किशोरवयीन मुलं आणि शाळेत जाणारी लहान मुलं यांनाही ही त्रास होऊ लागला आहे.

    मानसिक तणावाचं कारण
    इंडियन स्पायनल इंज्युरीज सेंटरचे मेडिकल डायरेक्टर डॉ. एच. एस. छाबडा यांनी सांगितलं की, लॅपटॉप किंवा मोबाईलवर सलग खूप वेळ बसून मेसेज करत बसल्यामुळे मानेचे सांधे, स्नायू यांच्यावर जास्त भार येतो. तुमचं पोश्चर नीट नसेल तर हा त्रास जास्त होतो. एकदम ताण पडल्यासारखं होतं किंवा मानदुखी सुरु होते. मानेचे स्नायू आखडल्याने मान जिथे मेंदूला जोडली जाते तिथे सूज निर्माण होते. मानसिक ताण येतो.

    टेकनेक कसा होतो ?
    मोबाईल गॅजेटच्या स्क्रीनवर खाली बघताना आणि बराच काळ टेक्स्टिंग करताना डोकं खूप वेळ खाली वाकून ठेवावं लागतं. याविषयी सांगितलं जातं की. जेव्हा डोकं पुढे वाकवतो तेव्हा डोक्याचं वजन वाढल्यासारखी स्थिती होते. काहीही हालचाल नसताना डोक्याचं वजन साधारण 5 किलोग्रॅम असतं. डोकं जेवढं वाकवू तेवढा मानेवर ताण येतो. डोक्याचं वजन पाचपट वाढतं. त्यामुळे मानेचे आजार सुरु होऊ शकतात.

    अनेक लोक मोबाईल आणि लॅपटॉपवर काम करतात तेव्हा ते मान पुढे वाकवून काम करतात. स्क्रीन टाईन साधारण सहा ते आठ तास असतो. हे पोश्चर चुकीचं असल्याने आजारांना निमंत्रण मिळतं.