this independence day reliance jio also celebrate 75 years with 3 new jio offers know details in marathi here nrvb

टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने ३ 'दणादण ऑफर्स' आणल्या आहेत. कंपनीने Jio Independence Day ऑफरची घोषणा केली असून या ऑफर्स अंतर्गत कंपनीने २ हजार ९९९ रुपयाच्या रिचार्जवर ३ हजार रुपयांच्या ऑफरची घोषणा केली होती. तर दुसऱ्या ऑफर मध्ये ७५० रुपयाची घोषणा केली आहे.

  नवी दिल्लीः Reliance Jio Independence Day Offer : स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहीमेची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर संपूर्ण देशभरात नागरिकांत मोठा उत्साह संचारला असल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावर अनेकांनी डीपी म्हणून तिरंगा ठेवला आहे.

  या दिनाचे औचित्य साधून टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने ३ दणादण ऑफर्स आणल्या आहेत. कंपनीने Jio Independence Day ऑफरची घोषणा केली असून या ऑफर्स अंतर्गत कंपनीने २ हजार ९९९ रुपयाच्या रिचार्जवर ३ हजार रुपयांच्या ऑफरची घोषणा केली होती. तर दुसऱ्या ऑफर मध्ये ७५० रुपयाची घोषणा केली आहे. यात युजर्संना ९० दिवसांसाठी अनलिमिटेड प्लान देण्यात येत आहे. याशिवाय, कंपनीने ‘हर घर तिरंगा, हर घर जिओ फायबर’ ऑफरची सुरुवातही केली आहे.

  ऑफर १

  Jio ची Independence Offer आहे. ही ऑफर वार्षिक रिचार्ज संबंधीची आहे. याची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. यासोबत ३ हजार रुपयाचे बेनिफिट्स मिळणार आहेत. याशिवाय, रोज २.५ जीबी डेटा देण्यात येईल. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. या ऑफरची वैधता ३६५ दिवसाची आहे. अन्य बेनिफिट्समध्ये ७५ जीबी डेटा दिला जाईल. हा प्लान ७५० रुपयाचा आहे. तर Ixigo च्या ७५० रुपयांचे कूपन दिले जाईल. याशिवाय, Netmeds चे ७५० रुपयाचे कूपन आणि jio चे ७५० रुपयाचे कूपन दिले जातील. एकूण मिळून याप्रमाणे ३ हजार रुपयाचे बेनिफिट्स मिळणार आहेत.

  ऑफर २

  यात 750 चा Unlimited Plan आहे. या प्लानमध्ये युजर्संना ७४९ रुपयात रोज २ जीबी डेटा मिळत आहे. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळत असून रोज १०० एसएमएस उपलब्ध होणार आहेत. जिओ ॲप्सचे ॲक्सेसही दिले जात आहेत. हा प्लान ९० दिवसांसाठी वैध असणार आहे. याशिवाय, १ रुपयात हाय स्पीड डेटा प्लान देण्यात येणार आहे. यात १०० एमबी हाय स्पीड डेटा दिला जाईल. याची वैधता ९० दिवसांची असणार आहे.

  ऑफर ३

  ही ऑफर Har Ghar Tiranga, Har Ghar JioFiber ची आहे. ही ऑफर नवीन जिओ फायबर कनेक्शनसाठी असणार आहे. हा JioFiber Postpaid Entertainment Bonanza प्लान आहे. हा १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्टपर्यंतच उपलब्ध असणार आहे. या प्लानमध्ये नवीन युजर्संना १५ दिवसाचे अतिरिक्त बेनिफिट्स मिळणार असून सर्वात महत्वाचे म्हणजे हे ॲक्टिवेशन १९ ऑगस्टपर्यंत आहे. हे बेनिफिट्स ४९९ रुपये, ५९९ रुपये, ७९९ रुपये आणि ८९९ रुपयांत उपलब्ध आहेत. हे बेनिफिट्स ६ महिने किंवा १२ महिन्यांसाठी उपलब्ध असणार आहेत.