
वॉट्सअॅपच्या मासिक युजर सुरक्षा अहवालानुसार, एकट्या ऑगस्ट महिन्यात वॉट्सअॅपने २.३ दशलक्ष भारतीय युजरवर बंदी घातली आहे. संपर्कातील लोकांना असत्यापित माहिती किंवा स्पॅम मेसेज केल्यास तुमचेही वॉट्सअॅप खाते बंद होण्याची पुरेपूर शक्यता आहे.
मुंबई – तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या काही चुकांमुळे तुमेचे वॉट्सअॅप खाते हे बंद होऊ शकते. आपल्या खात्याचा वापर तुम्ही स्पॅम किंवा दुसऱ्यांची सुरक्षा धेक्यात आणण्यासाठी केला तर तुमचे वॉट्सअॅप खाते बंद केले जाऊ शकते.
वॉट्सअॅपच्या मासिक युजर सुरक्षा अहवालानुसार, एकट्या ऑगस्ट महिन्यात वॉट्सअॅपने २.३ दशलक्ष भारतीय युजरवर बंदी घातली आहे. संपर्कातील लोकांना असत्यापित माहिती किंवा स्पॅम मेसेज केल्यास तुमचेही वॉट्सअॅप खाते बंद होण्याची पुरेपूर शक्यता आहे. जरी तुम्ही चांगल्या हेतूने वॉट्सअॅपचा वापर केला असला तरी तुमच्या कृतीने जर कंपनीच्या सेवा, अटी कराराचे उल्लंघन झाले तरी तुमचे खाते बॅन होऊ शकते.
चुकीच्या कार्यात गुंतलेल्या युजरला प्रतिबंध घालण्यासाठी व्हॉट्सअॅप अनेक सुरक्षा उपाय आणि प्रक्रिया वापरते, जे अशा कार्यात गुतलेल्या व्यक्तींवर स्वयंचलितपणे कारवाई करते. म्हणून तुमचे खाते बंद होऊ नये यासाठी पुढील गोष्टी करणे टाळा.
१) दुसऱ्याला मेसेज पाठवण्यापूर्वी विचार करा
२) मोट्या प्रमाणात संदेश पाठवणे टाळा
३) ब्रॉडकास्ट यादीचा गरजेपेक्षा अधिक वापर करू नका
४) ग्रुपमध्ये अॅड करताना परवानगी घ्या
५) व्हॉट्सअॅपच्या अटी आणि शर्थींचे उल्लंघन करू नका