गेल्या काही वर्षांपासून ट्विटरचे आर्थिक व्यवस्थापन बिघडत चालल्याचं चित्र होतं. इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर ट्विटरवर जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ट्विटरवरील ब्यू टिक ज्यांना देण्यात आली आहे त्यांच्याकडून फी आकारण्याचा निर्णय घेतला.
ट्विटरने (Twitter) गुरुवारी भारतात ब्लू सबस्क्रिप्शन (Blue Subscription) सेवा सुरू केली. अँड्रॉइड आणि iOS वापरणाऱ्यांना ब्लू सबस्क्रिप्शनसाठी दरमहा 900 रुपये द्यावे लागतील. तर वेब वापरकर्त्यांना 650 रुपयांमध्ये ब्लू सबस्क्रिप्शन मिळेल. वेब वापरकर्त्याने वार्षिक सबस्क्रिप्शन घेतल्यास सूट मिळेल. त्यांना 7800 ऐवजी 6800 रुपये द्यावे लागतील. वार्षिक सदस्यता योजना मोबाइल वापरकर्त्यांसाठी नाही.
ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनमध्ये काय ?
ब्लू सबस्क्रिप्शनमध्ये, युजर्सना ट्विट संपादित करण्याची, दीर्घ लांबीचे आणि 1080p मध्ये व्हिडिओ अपलोड करण्याची क्षमता मिळेल म्हणजेच एचडी गुणवत्ता, वाचक मोड आणि निळा चेकमार्क. याशिवाय रिप्लाय, मेन्शन आणि सर्चमध्ये प्राधान्य दिले जाईल.
सामान्य युजर्सना 50% कमी जाहिराती दिसतील आणि नवीन फीचर्सनाही प्राधान्य मिळेल.सदस्य त्यांचे हँडल, डिस्प्ले नाव किंवा प्रोफाईल फोटो बदलण्यास देखील सक्षम असतील, परंतु त्यांनी तसे केल्यास, त्यांच्या खात्याचे पुन्हा पुनरावलोकन होईपर्यंत निळा चेकमार्क तात्पुरता काढून टाकला जाईल. व्यवसायांसाठी अधिकृत लेबल गोल्ड चेकमार्कने बदलले जाईल. तर सरकारी आणि मल्टीलॅटरल अकाऊंटसाठी ग्रे रंगाचा चेकमार्क असेल.
गेल्या काही वर्षांपासून ट्विटरचे आर्थिक व्यवस्थापन बिघडत चालल्याचं चित्र होतं. इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर ट्विटरवर जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ट्विटरवरील ब्यू टिक ज्यांना देण्यात आली आहे त्यांच्याकडून फी आकारण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला, इलॉन मस्क म्हणाले होते की, ट्विटरच्या मूळ ब्लू टिकमध्ये जाहिरातींची संख्या निम्मी असेल आणि पुढील वर्षापासून जाहिरातीची संख्या वाढवण्यात येईल. इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनीमध्ये अनेक बदल केले आहेत.