ट्विटर सेवा खंडीत; अकाउंट सुरु करण्यात कोट्यवधी युजर्सना अडचणी, लॉगइन केल्यानंतर आपोआप बंद

जगभरात पुन्हा एकदा मायक्रोब्लॉगिंग सर्विस ट्विटर ठप्प झाल्याचे समोर येत आहे. आज सकाळपासून ट्विटर सेवा खंडीत असल्याचे समोर येत आहे. ट्विटर लॉगिन करताना कोट्यवधी युजर्सना अडचणी जाणवत आहेत. आयडी लॉगइन केल्यानंतरही ट्विटर नेहमीप्रमाणे सुरू होत नसल्याच्या तक्रारी वापरकर्त्यांकडून येत आहेत.

    मुंबई : सोशल मीडिया (Social Media) खंडित होण्याच्या घटना मागील काही दिवसांपासून वाढल्या आहेत. याचा फटका युजर्सना (Users) मोठ्या प्रमाणात बसत आहे. यावरून युजर्सनी सुनावल्यानंतर सेवा नियमीत मिळत होती. मात्र आता पुन्हा या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

    जगभरात पुन्हा एकदा मायक्रोब्लॉगिंग सर्विस ट्विटर (Twitter) ठप्प झाल्याचे समोर येत आहे. आज सकाळपासून ट्विटर सेवा खंडीत (Service Down) असल्याचे समोर येत आहे. ट्विटर लॉगिन करताना कोट्यवधी युजर्सना अडचणी जाणवत आहेत. आयडी लॉगइन (ID Login) केल्यानंतरही ट्विटर नेहमीप्रमाणे सुरू होत नसल्याच्या तक्रारी वापरकर्त्यांकडून येत आहेत.

    भारतातही लाखो ट्विटर वापरकर्त्यांना आज सकाळी लॉगइन करताना अडचण येत आहे. वापरकर्त्यांनी सांगितले की, लॉगइन असलेले अकाउंट आपोआप बंद झाले. त्यानंतर पुन्हा लॉगइन करण्याचा प्रयत्न केला तर आयडी आणि पासवर्ड टाकूनही ते सुरु होत नाही.