व्हॉट्सॲपवर येणार नवीन फीचर; कुणी टॅग, मेंशन केल्यास येणार नोटिफिकेशन!

व्हॉट्सॲप स्टेटसबाबत एक नवीन फीचर (WhatsApp New Feature) येणार आहे. त्याच्या मदतीने, तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये एखाद्याला टॅग किंवा उल्लेख करु शकणार आहात. यानंतर, व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट होताच त्या यूजरला एक नोटिफिकेशन पाठवले जाईल.

  जगभरात सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसह व्हॉट्सअप युजर्सची संख्या जास्त आहे. व्हॉट्सअप (WhatsApp) कंपनीकडून नेहमी आपल्या युजर्संना विशेष काहीतरी देण्यावर भर असतो. त्यात आता व्हॉट्सअपकडून नवं फीचर आणलं (WhatsApp New Feature) आहे. या फिचरचं नाव आहे स्टेटस नोटिफिकेशन्स. चला जाणून घेऊया या नव्या फिचरबद्दल.

  काय आहे नवीन फिचर

  Wabetainfo दिलेल्या माहिती नुसार, व्हॉट्सॲप एक नवीन फीचर आणत आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स स्टेटस नोटिफिकेशन्स वापरू शकतील. ही सूचना इतर कोणत्याही सूचनांप्रमाणे जाईल. या फीचरच्या मदतीने यूजर्सना स्टेटस दरम्यान उल्लेख करण्याचा पर्याय मिळेल. या फीचरच्या मदतीने, ज्या युजरचा उल्लेख किंवा टॅग असेल त्याला स्टेटस नोटिफिकेशन पाठवले जाईल, त्यानंतर त्याला व्हॉट्सॲप स्टेटस पाहावे लागेल.

  स्क्रीनशॉट आला समोर

  Wabetainfo ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये स्टेटस नोटिफिकेशन स्पष्ट केले आहे. ही सूचना व्हॉट्सॲपच्या इतर सूचनांसारखी असेल. हे फीचर WhatsApp बीटा Android 2.24.8.13 मध्ये दिसले आहे. हे अपडेट स्थिर आवृत्तीमध्ये कधी येईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

  व्हॉट्सॲप स्टेटस सामान्यतः सर्व वापरकर्ते पाहू शकतात, परंतु जर तुम्ही एखाद्या खास प्रसंगी किंवा त्याच्या/तिच्या वाढदिवसानिमित्त स्टेटस बनवले असेल, तर तुम्ही स्टेटसमध्ये त्याचा उल्लेख करू शकता. यानंतर स्टेटस पोस्ट होताच स्टेटसमध्ये नमूद केलेल्या युजरला नोटिफिकेशन पाठवले जाईल. यानंतर युजरला ते स्टेटस पाहावे लागेल.