अरे वाह, आता चुकून डिलीट केलेले मेसेज परत येणार! WhatsApp चं ‘हे’ नवं फिचर आहे खूप कामाच

चुकून मेेेेेसेज डिलिट झाल्यास आता चिंता करण्याच कारण नाही कारण WhatsApp ने आणले Accidental delete फीचर यामुळे आता चुकून डिलीट केलेले मेसेज तुम्ही परत मिळवु शकता.

    नेहमी अपडेट होत राहणाऱ्या WhatsApp कडून आता युझर्सना एक नवी सुविधा देण्यात आली आहे.  WhatsApp ने आता एक असं नवीन फीचर आणले आहे, ज्याच्या माध्यमातून चुकून डिलीट केलेले मेसेज UNDO केले जाऊ शकतात. ‘Accidental delete ‘फीचर असं या नवं फीचरचं नाव आहे. यामुळे आता डिलिट झालेल्या मेसेज आता परत मिळवण सोप होणार आहे.

    कसं आहे हे ‘Accidental delete ‘ फीचर

    WhatsApp वर मेसेज करताना बऱ्याचदा आपण आपल्या हातुन कुणाला पाठलेला मेसेज चुकून डिलीट होतो. मग मात्र पश्चाताप करण्यापलीकडे आपण काहीही करु शकत नाही. मात्र आता असं होणार नाही. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही चुकीच्या व्यक्ती किंवा ग्रुपला मेसेज पाठवता आणि चुकून ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ ऐवजी ‘डिलीट फॉर मी’ वर क्लिक करता. यावेळी हे अॅक्सिडेंटल डिलीट फीचर उपयोगात येईल.  हे फीचर यूजर्सना चुकून डिलीट झालेल्या मेसेजला पाच सेकंदांची विंडो देऊन मेसेज UNDO करण्यासाठी काही सेकंदाचा वेळ देते. अशाप्रकारे तुम्ही चुकून डिलिट झालेले मेसेज परत  मिळवू शकता. हे फीचर Android आणि iPhone डिव्हाइसवरील सर्व यूजर्ससाठी उपलब्ध आहे.

    मेसेज युवर सेल्फ’ फीचर
    काही दिवसांपुर्वी WhatsApp ने ‘मेसेज युवर सेल्फ’ फीचर लॉन्च करण्याची घोषणा केली. हे फीचर तुम्हाला नोट्स, रिमांइडर आणि अपडेट पाठवण्यासाठी तुमचा स्वतःचा नंबर मेसेज करण्याची सुविधा देते. या फीचर्समुळे युजर्स व्हॉट्सअॅपवर त्यांची टू-डू लिस्ट मॅनेज करण्यासाठी नोट्स, रिमाइंडर्स, शॉपिंग लिस्टसारखे मेसेज देखील पाठवू शकतात.