WhatsApp चं जबरदस्त फीचर येतंय ! आता तुम्ही…

जगभरात सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसह व्हॉट्सऍप युजर्सची संख्या जास्त आहे. असे असताना सोशल मीडियापैकी एक असलेल्या व्हॉट्सऍप (WhatsApp) कंपनीकडून आपल्या युजर्संना विशेष काहीतरी देण्यावर भर असतो.

नवी दिल्ली : जगभरात सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसह व्हॉट्सऍप युजर्सची संख्या जास्त आहे. असे असताना सोशल मीडियापैकी एक असलेल्या व्हॉट्सऍप (WhatsApp) कंपनीकडून आपल्या युजर्संना विशेष काहीतरी देण्यावर भर असतो. त्यात आता व्हॉट्सऍपकडून नवं फीचर आणलं जात आहे. त्या माध्यमातून जास्त कालावधीचा व्हॉइस मेसेजसाठी ट्रान्सक्रिप्शन फीचर्स दिले जाणार आहे.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, डेव्हलपर एका नवीन फीचरवर काम करत आहेत. जे iOS युजर्संना व्हिडिओ संदेश पाठविण्याची परवानगी मिळू शकते. या फीचरच्या मदतीने आयफोन यूजर्स 60 सेकंदांचा व्हिडिओ मेसेज पाठवू शकणार आहेत. सध्या हे फीचर जरी उपलब्ध नसले तरी लवकरच हे बीटा युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे. व्हॉट्सऍपवरून ‘पिक्चर इन पिक्चर’सोबत, iOS साठी व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरू केली जाऊ शकते. याशिवाय व्हॉट्सऍप ‘मेसेज युवरसेल्फ’ फीचर सुरू करण्याची शक्यता आहे. मात्र, हे फीचर्स लागू करण्यासाठी किती वेळ लागेल, सध्या याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.

WhatsApp कडून नवीन विंडो ऍप

व्हॉट्सऍप युजर्सच्या गरजा लक्षात घेता अनेक नवनवीन फीचर्स आणले जात आहेत. व्हॉट्सऍपने अलीकडेच एक नवीन विंडो ऍप लॉन्च केले आहे. जे WhatsApp मोबाईल ऍपसारखे दिसते. WhatsApp चे हे विंडो ऍप पूर्वीपेक्षा वेगवान झाले असले तरी यासोबतच या ऍपमध्ये 8 लोकांच्या व्हिडिओ कॉलिंगसारखे काही नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच 32 लोकांच्या ऑडिओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.