WinZO बनले एमसेवावर समाविष्‍ट होणारे भारतातील पहिले इंटरॲक्टिव्‍ह मनोरंजन व्‍यासपीठ; या आहेत ऑफर्स, वाचा सविस्तर

एमसेवा (mSeva) सोबतचा हा सहयोग सरकारच्‍या ‘आत्‍मनिर्भर भार’ अभियानाला अधिक दृढ करतो, जेथे WinZO भारतच्‍या द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील १०० दशलक्षहून अधिक वापरकर्त्‍यांसह १२ प्रादेशिक भाषांमध्‍ये उपलब्‍ध आहे. २० टक्‍के वापरकर्त्‍यांनी WinZO वर त्‍यांचे पहिले डिजिटल पेमेंट केले आहे.

  • एमसेवा कोणतेही शुल्‍क न आकारता ॲप्सची सूची आणि वितरण ऑफर करत आहे
  • एमसेवा ॲप स्टोअरवर बातम्या, सोशल मीडिया, पेमेंट इत्यादींसह १०००हून अधिक ॲप्स-आधारित सेवा उपलब्ध आहेत
  • WinZO हे एमसेवावर उपलब्ध होणारे पहिले गेमिंग ॲप्लिकेशन आहे 
  • हे गुगलच्या ऑनलाइन गेमिंगच्या ‘अनियंत्रित वर्गीकरणा’च्या अंमलबजावणीशी संलग्‍न आहे, जे एक वर्षासाठी प्‍ले स्‍टोअरवर फक्त फॅन्‍टसी गेमिंग आणि रमी ॲप्सचा आनंद देते

मुंबई : भारतातील सर्वात मोठे इंटरॲक्टिव्‍ह मनोरंजन व्‍यासपीठ WinZO सरकारच्‍या मालकीचे व विकसित मोबाइल ॲप स्‍टोअर एमसेवामध्‍ये समाविष्‍ट होण्‍याकरिता निवडण्‍यात आले आहे. WinZO हे मिनिस्‍ट्री ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲण्‍ड इन्‍फॉर्मेशन टेक्‍नोलॉजी (एमईआयटीवाय) ने लाँच केलेले भारतातील एकमेव स्‍वदेशी नि‍र्मित ॲप स्‍टोअर एमसेवावर उपलब्‍ध असणारे पहिले गेमिंग व इंटरॲक्टिव्‍ह मनोरंजन व्‍यासपीठ आहे.

एमसेवा (mSeva) सोबतचा हा सहयोग सरकारच्‍या ‘आत्‍मनिर्भर भार’ अभियानाला अधिक दृढ करतो, जेथे WinZO भारतच्‍या द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील १०० दशलक्षहून अधिक वापरकर्त्‍यांसह १२ प्रादेशिक भाषांमध्‍ये उपलब्‍ध आहे. २० टक्‍के वापरकर्त्‍यांनी WinZO वर त्‍यांचे पहिले डिजिटल पेमेंट केले आहे.

या सहयोगाबाबत बोलताना WinZOच्‍या सह-संस्‍थापक सोमया सिंग राठोड म्‍हणाल्‍या, “आम्‍हाला भारतीयांद्वारे भारतीयांसाठी एमईआयटीवायच्‍या आश्रयांतर्गत ॲप स्‍टोअर एमसेवासोबत सहयेाग करण्‍याचा आनंद होत आहे. हा सहयोग भारतातील प्रत्‍येक कुटुंबाला सेवा देण्‍याकरिता जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उत्‍पादन निर्माण करण्‍याच्‍या WinZO च्‍या मिशनशी संलग्‍न आहे. एमसेवा आम्‍हाला आमची पोाहेच बहुपटीने वाढण्‍यास आणि भारतीयांना पात्र असलेला गेमिंग अनुभव देण्‍यास मदत करेल.’’

ॲप्लिकेशन्‍सची निवड व वितरण आणि उच्च कमिशन शुल्कावरील गुगलची मक्तेदारी मोडून काढणे हे देखील या मिशनचे उद्दिष्ट आहे. आज, भारतीय मोबाइल मार्केटमध्ये ९५ टक्‍के मार्केट शेअरसह अँड्रॉईडचे वर्चस्व आहे आणि यामुळे विकासकांना त्यांचे ॲप्स प्रकाशित व वितरित करण्याचा पर्याय म्हणून फक्त गुगल प्‍ले स्‍टोअर उपलब्ध आहे. हे ॲप-मधील खरेदीसाठी ३० टक्‍क्‍यांच्या श्रेणीत कमिशन आकारते. याचा विकासकांच्या महसुलावर नकारात्मक परिणाम होतो आणि व्यवहार्य महसूल मॉडेल्सच्या अभावामुळे देशात आयपी/ कन्‍टेन्‍ट निर्मितीवर दीर्घकालीन परिणाम होतो.

दुसरीकडे, एमसेवा फक्‍त सरकारी व इतर सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठीच नाही तर आरोग्य, शिक्षण, कृषी, आर्थिक, ऑनलाइन पेमेंट, समाजकल्याण, अन्न, वाहतूक, ऊर्जा, यासह खाजगी कंपन्यांसाठी देखील कोणतेही वितरण शुल्क आकारत नाही. स्केलेबल तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करता येणारे कमी किमतीचे आणि त्वरीत बिल्ड ॲप्स सेट करण्यात व्यवसायांना मदत करण्यासाठी एमसेवाने डिजिटल पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. एमसेवा ॲप स्टोअरवर बातम्या, सोशल मीडिया, पेमेंट इत्यादींसह १००० हून अधिक ॲप्स-आधारित सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये MyGov, पेटीएम इत्यादींचा समावेश आहे. WinZO हे ॲप स्टोअरच्या सुरुवातीच्या खाजगी दत्तक घेणार्‍यांपैकी एक आहे आणि त्यांच्या संभाव्य वापरकर्त्यांमध्ये ॲप डाउनलोड करण्याचा मार्ग म्हणून एमसेवाला प्रोत्साहन देण्याची योजना आहे.

WinZO देशभरातील थर्ड पार्टी गेम डेव्हलपर्सकडून १०० हून अधिक गेम होस्ट करते. यात एक अद्वितीय सूक्ष्म-व्यवहार आधारित व्यवसाय मॉडेल आहे, जे गेम डेव्हलपर्स आणि स्टुडिओना त्यांच्या १०० दशलक्ष वापरकर्त्यांच्या आधारे दरमहा ३.५ अब्ज मायक्रो ट्रान्झॅक्शन्सद्वारे १०० पट महसूल उत्पन्न करू देते. सोशल गेमिंग प्रवर्तकांनी विविध विभागांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण केल्या, ज्यात ५०० पेक्षा जास्त अनुवादकांचा समावेश आहे, जे मुख्यत्वे घरी राहणाऱ्या गृहिणी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आणि ७५,००० प्रादेशिक सूक्ष्म-प्रभावक आहेत आणि देशाच्‍या कानाकोपऱ्यामध्‍ये ॲपचे वितरण करतात.

एमसेवा ॲपवरून WinZO डाऊनलोड करण्‍याची पद्धत:

  • https://apps.mgov.gov.in/ या वेबसाइटवर जा.
  • सर्च बारवर WinZO सर्च करा.
  • डाऊनलोड बटनवर क्लिक करा.